वनविभागाच्या पिंजऱ्यात अखषर अडकला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 05:42 PM2019-12-29T17:42:45+5:302019-12-29T17:44:15+5:30
कळवण : तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने भयभयीत झालेल्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या पिंजºयात बिबट्याची मादी अडकल्याने दिलासा मिळाला असून वनविभागाच्या कामावर शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले असून वनविभागाच्या यंत्रणेचे गावात कौतूक होत आहे.
कळवण : तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने भयभयीत झालेल्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या पिंजºयात बिबट्याची मादी अडकल्याने दिलासा मिळाला असून वनविभागाच्या कामावर शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले असून वनविभागाच्या यंत्रणेचे गावात कौतूक होत आहे.
पाळे खुर्द परिसरात बिबट्या मादी गेल्या पाच सहा दिवसापासून वनविभागाच्या पिंजºयात येतं नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते तर वनविभागाची यंत्रणा सातत्याने या परिसरात लक्ष देऊन शेतकºयांना दिलासा देत होती.
कळवण तालुक्यात सध्या कांदा लागवड व ऊसतोड हंगाम जोमात सुरु आहे. पाळे खुर्द येथील विकी दादाजी पाटील यांचे गट नंबर ४१५ या शेतात ऊसतोड सुरु असतांना मंगळवारी (दि.२४) चार वाजता मजुरांना बिबट्याचे १० ते १२ दिवसांचे नवजात तीन बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ऊसतोड मजुरांना बछड्यांसह मादीचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
याबाबत कळवण वनविभागाला माहिती देण्यात आल्याने या परिसरात वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला होता. बिबट्या मादी पिंजºयात येत नसल्याने वनविभाग यंत्रणा अस्वस्थ होती. बिबट्याची ३ बछडी कधी उसाच्या शेतात तर कधी बाहेर येत होती. परंतु ट्रॅप कॅमेºयात मादी दिसून येत नव्हती.
शनिवारी (दि.२८) रात्री ३ व वाजेच्या सुमारास बिबट्या मादी पिंजºयात पडल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. बिबट्या मादी व तीन बछडे सुरक्षित असून पशुधन अधिकारी, पशु वैद्यकीय अभोणा यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहिती कळवणचे वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील यांनी दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. बी. हिरे वनरक्षक पंकज देवरे, चव्हाण, सोनवणे, सुचिता पाटील, वनमजूर गोंधळे, बस्ते यांनी मोहीम यशस्वी केली.
शेतकºयांना दिलासा..
कळवण तालुक्यात कांदा लागवड व ऊसतोड सुरु आहे. वीज वितरण कंपनीकडून शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा सुरु असल्याने शेतकºयांना रात्री पिकांना पाणी भरल्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बिबट्याच्या भितीने नागरिकांचे रात्री घराबाहेर बाहेर निघणेही मुश्किल झाले होते. आता दिलासा मिळाला आहे. वनविभागाने तातडीने उपायोजना करून बिबट्या व बछडे जेरबंद केले.
- विकी पाटील.
(फोटो २९ कळवण बिबट्या, २९ कळवण बिबट्या १)
पाळे खुर्द येथील विकी पाटील यांच्या उसाच्या शेतात आढळलेले बछडे.