जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:48 AM2019-07-11T00:48:46+5:302019-07-11T00:49:11+5:30

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी (दि.९) मध्यरात्री बजरंग दल, गोवंश रक्षा दलाचे कार्यकर्ते व सिन्नर पोलिसांच्या गस्ती पथकाने भाटवाडी शिवारात हॉटेल निसर्गजवळ जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या टेम्पोतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सुमारे चार टन मांसासह १ लाख ९० हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Caught a meathopper tempo | जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला

जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Next
ठळक मुद्देभाटवाडी शिवार : सुमारे चार टन मांस जप्त

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी (दि.९) मध्यरात्री बजरंग दल, गोवंश रक्षा दलाचे कार्यकर्ते व सिन्नर पोलिसांच्या गस्ती पथकाने भाटवाडी शिवारात हॉटेल निसर्गजवळ जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या टेम्पोतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सुमारे चार टन मांसासह १ लाख ९० हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर बाजूकडून अवैध मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पोची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती (क्र. एमएच ०८ पी ६४९९) घोटी मार्गावर हॉटेल निसर्गजवळ बजरंग दल व गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी अडविला. त्यात बर्फाच्या मोठ्या लाद्यांमध्ये मांसाचे तुकडे असल्याचे आढळून आले.
याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलीस गस्ती पथकातील हवालदार जाधव, पोलीस शिपाई अमोल गुंजाळ यांनी घटनास्थळी येत सदर वाहनाचा ताबा घेतला. पोलिसांनी संशयित नासीर हुसेन गुलाम हुसेन मलिक (२०) व अरबाज अब्दुल हमीद कुरेशी (१९) दोघे, राहणार कुर्ला, मुंबई यांना ताब्यात घेतले.विनापरवाना वाहतूक जप्त केलेला टेम्पो पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यातील मांसाचे वजन केले असता ते ३७९० किलोग्रॅम इतके भरले. या मांस वाहतुकीबाबत कोणताही परवाना वरील दोघांकडे नव्हता. पोलिसांनी रात्री उशिरा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. बुधवारी (दि.१०) या दोघांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गंगाराम सारूक्ते तपास करीत आहेत.

Web Title: Caught a meathopper tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.