कौळाणे गर्भपात प्रकरणातील एजंट पोलीसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 05:46 PM2019-02-01T17:46:39+5:302019-02-01T17:46:54+5:30
मालेगाव : कौळाणे शिवारात बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयीत सहाही आरोपींची पोलीसांनी कसून चौकशी केली आहे. या चौकशीत तुषार पाटील नामक एजंटचे नाव समोर येत असून पोलीस या एजंटचा शोध घेत आहेत.
मालेगाव : कौळाणे शिवारात बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयीत सहाही आरोपींची पोलीसांनी कसून चौकशी केली आहे. या चौकशीत तुषार पाटील नामक एजंटचे नाव समोर येत असून पोलीस या एजंटचा शोध घेत आहेत. दरम्यान अटक केलेल्या रविंद्र बाळु पवार याला पोलीसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी तर डॉ. राहुल प्रदिप गोसावी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
कौळाणे अवैध गर्भपात प्रकरणात पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. संशयीत आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबावरुन पोलीस तुषार पाटील नामक एजंटचा शोध घेत आहेत. पाटील यानेच गर्भपातासाठी रुग्ण पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले. डॉ. गोसावी याच्याही मोबाईलचे कॉल डिटेल्स् तपासली जात आहेत. दरम्यान अर्भकची डिएनए चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. मनमाड चौफुलीवरील हॉटेलचे सिसिटीव्ही फुटेज स्कॅनींग करुन तपासली जात आहेत. या प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडता मुळाशी जाऊन सखोल चौकशी केली जाणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.