सावधान सिडको, सातपूरमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:52+5:302021-09-18T04:15:52+5:30
नाशिक शहरात गेल्यावर्षी केवळ डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होती अन्यथा दरवर्षी संख्या अधिक असते. मात्र, यंदा डेंग्यूबरोबरच चिकुन गुन्याचे ...
नाशिक शहरात गेल्यावर्षी केवळ डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होती अन्यथा दरवर्षी संख्या अधिक असते. मात्र, यंदा डेंग्यूबरोबरच चिकुन गुन्याचे रुग्ण आढळण्यास प्रारंभ झाला. सातपूर विभागातील ध्रुवनगर आणि नंतर तेथून सातपूर, अंबड लिंकरोड या भागात रुग्ण आढळण्यास प्रारंभ झाला. आज शहरात सर्वच विभागात रुग्णसंख्या वाढली असली तरी सिडको आणि सातपूर भागात तर सर्वाधिक रुग्ण आहेत. महापालिकेने कार्यवाही केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
पावसाळ्यात डेंग्यू आणि चिकुन गुन्या हे आजार होत असले तरी जलजन्य आजारही सुरू झाले आहेत. महापालिकेत त्याची नोंद अत्यल्प असली तरी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.
इन्फो...
रोज किमान सहा रुग्ण
नाशिक शहरातील सर्वच भागात डेंग्यू आणि चिकुन गुुन्याचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, दिवसाकाठी किमान पाच ते सहा रुग्ण आढळत आहेत. अर्थात, खासगी लॅबमधूनदेखील वेळेत माहिती मिळावी यासाठी संंबंधित लॅब चालकांनादेखील त्वरित माहिती देण्याची तंबी देण्यात आली आहे.
इन्फो
मोठ्या माणसांचे प्रमाण अधिक
- डेंग्यू, चिकुन गुन्याबाधितांमध्ये सध्या मोठ्या माणसांचे प्रमाण अधिक आहे. अर्थात, लहान मुलांना हे आजार होण्याचे प्रमाण नगण्य आहे.
- सध्या लहान मुलांचे बाहेर पडण्याचे प्रमाण कमी आहे, त्या तुलनेत मोठ्या माणसांची भ्रमंती अधिक असल्याने प्रौढांमध्येच हा आजार आढळण्याचे प्रमाण आढळले आहे.
काेट...
नाशिकमध्ये सिडको परिसरात डेंग्यूचे प्रमाण अधिक आहे. दाट वस्तीचा हा भाग आहे. महापालिका आपल्या पातळीवर प्रयत्न करीत असली तरी नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचून डासांच्या उत्पत्तीला प्रेरक वातावरण होऊ देऊ नये.
- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ, महापालिका
इन्फो...
काय आहेत लक्षणे..
डेंग्यू - ताप येणे हा सर्वात महत्त्वाचा भाग असला तरी रक्तबिंबीका कमी होतात आणि त्यामुळे थकवा येण्याबरोबरच अनेकदा नाकातून रक्तस्त्राव होतो. तसेच अनेकदा रॅशदेखील उमटतात.
चिकुन गुुन्या- डासांमुळे होणारा हा आजार मध्यंतरी कमी झाला होता. यंदा मात्र प्रथमच डेंग्यूइतकाच चिकुन गुन्याही वाढला आहे. डेंग्यूप्रमाणेच लक्षणे असले तरी हातपाय दुखणे हे याचे वेगळे लक्षण आहे.
कावीळ - हा जलजन्य आजार असून, प्रदूषित पाण्यामुळे तो होतो. भूक मंदावणे, डोळे आणि अंग पिवळे पडणे ही त्याची लक्षणे आहेेत. अर्थात, शहरात त्याचे प्रमाण नगण्य आहे.
इन्फो...
डेंग्यू- ७१७
चिकुन गुन्या - ५३७
कावीळ- १५