महापालिकेतही खबरदारी

By admin | Published: May 16, 2017 12:37 AM2017-05-16T00:37:23+5:302017-05-16T00:38:24+5:30

नाशिक : अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेमधून चोरलेल्या ‘सायबर शस्त्रा’च्या आधारे हॅकर्सनी केलेल्या सायबर हल्ल्याचा धसका महापालिकेनेही घेतला

Cautious in the municipal corporation | महापालिकेतही खबरदारी

महापालिकेतही खबरदारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेमधून चोरलेल्या ‘सायबर शस्त्रा’च्या आधारे हॅकर्सनी केलेल्या सायबर हल्ल्याचा धसका महापालिकेनेही घेतला असून, ई-मेलमधील कोणत्या अ‍ॅटॅचमेंटमध्ये व्हायरस पसरू शकतो याची माहिती सर्व खातेप्रमुखांना देण्यात आली आहे व त्याबाबतची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व विभागांना संगणक विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी फार मोठ्या प्रमाणात संगणकीय कार्यप्रणालीवर रॅन्समवेअर या संवर्गातील व्हायरसचा हल्ला झाला आहे. या व्हायरसमुळे जवळपास ७४ देशांमधील संगणकीय कार्यप्रणालीवर परिणाम झालेला आहे. प्रामुख्याने विन्डोजचे जुने व्हर्जन असलेल्या संगणकांवर या व्हायरसचा हल्ला झाला आहे. ज्या सिस्टिम्सवर हा व्हायरसचा हल्ला झाला त्या सिस्टीम्स पूर्णपणे लॉक होऊन सर्व डाटा हा व्हायरस एन्करप्ट करतो.
हा व्हायरस इंटरनेटद्वारे व प्रामुख्याने ई- मेलद्वारे पसरत आहे. ई-मेलमधील अ३३ंूँेील्ल३ ३ं२‘२ूँी.ी७ी या नावांची फाईल असल्यास ती ओपन केल्यास हा व्हायरस पसरतो आणि जेवढे संगणक नेटवर्कमध्ये कनेक्ट आहेत अशा सर्व संगणकावर या व्हायरसचा प्रभाव पडतो.
आतापर्यंत या व्हायरसला समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे खबरदारी बाळगणे व प्रतिबंधात्मक उपाय करणे हाच पर्याय आहे. सदर व्हायरसवर प्रतिबंधक उपाय म्हणून मनपाने मायक्रोसॉफ्टने प्रसिद्ध केलेले पॅचेस सर्व संगणकांवर अपडेट केले आहेत. तसेच मनपाच्या फायरवॉल सिस्टममध्येदेखील सदर पॅचेस अपडेट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ई-मेलमधील कोणत्या अ‍ॅटॅचमेंटमध्ये व्हायरस पसरू शकतो याची माहिती सर्व खातेप्रमुखांना देण्यात आली आहे व त्याबाबतची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व विभागांना संगणक विभागामार्फत देण्यात आल्याची माहिती संगणक विभागप्रमुख प्रशांत मगर यांनी दिली आहे.

Web Title: Cautious in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.