सीबीएस चौक आजपासून होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:44 AM2019-04-27T00:44:48+5:302019-04-27T00:45:22+5:30

त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभपर्यंत दुतर्फा रस्त्याचे पायलट प्रकल्पांतर्गत स्मार्ट विकास साधला जात आहे. याअंतर्गत विकासकाम सीबीएस चौकापर्यंत येऊन ठेपले असून, या चौकाचे बांधकाम सुरू होणार असल्यामुळे शनिवारपासून (दि.२६) सीबीएस सिग्नलवरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार

 CBS Chowk will be closed from today | सीबीएस चौक आजपासून होणार बंद

सीबीएस चौक आजपासून होणार बंद

googlenewsNext

नाशिक : त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभपर्यंत दुतर्फा रस्त्याचे पायलट प्रकल्पांतर्गत स्मार्ट विकास साधला जात आहे. याअंतर्गत विकासकाम सीबीएस चौकापर्यंत येऊन ठेपले असून, या चौकाचे बांधकाम सुरू होणार असल्यामुळे शनिवारपासून (दि.२६) सीबीएस सिग्नलवरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. गुरुवारी (दि.२५) वाहतूक शाखेकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
स्मार्टरोडचा विकास साधला जात असून, त्र्यंबकनाक्यापासून अशोकस्तंभापर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. अशोकस्तंभापासून सीबीएसपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने कॉँक्रीटीकरण पूर्ण झाले आहेत, तर समोरील बाजूने काम सुरू आहेत. दरम्यान, त्र्यंबकनाक्यापासून सीबीएसपर्यंतही रस्ता खोदला गेल्याने सीबीएस चौकातून पुढील काम केले जाणार आहे. यामुळे या चौकातून वाहतूक बंद करण्याचा निर्णय शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून घेतला गेला आहे. वाहतूक शाखेकडून अधिसूचनेनुसार शनिवारपासून अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. यामुळे टिळकवाडी व शालिमारकडून सीबीएस सिग्नलच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
शालिमारकडून टिळकवाडीकडे जाणाºया वाहनचालकांनी खडकाळी सिग्नल, जिल्हा परिषदेसमोरून त्र्यंबकनाकामार्गे पुढे मार्गस्थ व्हावे, तसेच कॉलेजरोड, गंगापूररोडवरून येणाºया वाहनचालकांनी टिळकवाडी सिग्नलवरून जलतरण तलाव सिग्नलमार्गे त्र्यंबकरोडने पुढे मार्गस्थ व्हावे, असा पर्यायी मार्ग वाहतूक शाखेकडून सुचविण्यात आला आहे.
वाहतूक कोंडीची उद्भवणार समस्या
जलतरण तलाव ते टिळकवाडी सिग्नलपर्यंतचा रस्ता अरुंद असून, दुतर्फा बंगले, व्यावसायिक संकू ले आहेत. तसेच महापालिके चे राजीव गांधी भवनाच्या वाहनतळाचे प्रवेशद्वार, रामायण बंगला, रुग्णालये, बॅँका, वसतिगृह असल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वर्दळ सुरू असते. टिळकवाडी सिग्नलवरून सीबीएसकडे जाता येणार नसल्यामुळे या पर्यायी मार्गावर वाहनांची संख्या वाढणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Web Title:  CBS Chowk will be closed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.