सीबीएसवरून ९० हजारांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:28 AM2019-08-19T01:28:49+5:302019-08-19T01:29:10+5:30
जुने सीबीएस स्थानक परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढत असून, वृद्ध प्रवाशांना चोरटे ‘लक्ष्य’ करत असल्याचे वारंवार घटनांमधून समोर येत आहे. या परिसरात पुन्हा चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाचे ९० हजारांचे दागिने गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना घडली आहे.
नाशिक : जुने सीबीएस स्थानक परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढत असून, वृद्ध प्रवाशांना चोरटे ‘लक्ष्य’ करत असल्याचे वारंवार घटनांमधून समोर येत आहे. या परिसरात पुन्हा चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाचे ९० हजारांचे दागिने गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना घडली आहे. सरकारवाडा पोलिसांनी या भागात सातत्याने गस्त घालून संशयास्पद तरुणांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मधुकर त्र्यंबक येवला (६४, रा. सहकार कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येवला हे गुरु वारी (दि.१५) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास जुने सीबीएस येथून भासवडला जाण्यासाठी बसमध्ये चढले. मात्र यावेळी बसमध्ये चढणाऱ्या अन्य प्रवाशांचीही गर्दी होती. तसेच सलग सुट्ट्यांमुळे बसस्थानकाच्या अवारातही प्रवाशांचे प्रमाण अधिक होते.
या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने येवला यांच्याजवळ असलेले तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.