सीबीएसई बारावी : नेहरूनगरचे ९८ टक्के, देवळाली कॅम्पचे ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण विद्यालयांनी राखली १०० टक्के निकालाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:18 AM2018-05-27T01:18:33+5:302018-05-27T01:18:33+5:30
नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला.
नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक यश मिळवले आहे. नाशिकमधील केंद्रीय विद्यालयांसह सिम्बॉययिस स्कूल, केंब्रिज स्कूलसारख्या सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या विद्यार्थ्यांनी यंदाही आपली लक्षणीय निकालाची परंपरा अखंडित राखली आहे.
सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा ८३.१ टक्के निकाल लागला आहे. नाशिक शहरातील सिम्बॉयसिस स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून, सिम्बॉयिससमधून अनुजा टिपरे हिने अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे. या परीक्षसाठी सिम्बॉयसिसचे ३१ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९१ ते ९५ टक्के मिळवणारे तीन विद्यार्थी आहेत. ८१ ते ९० टक्के गुण मिळवणारे सहा विद्यार्थी, तर ७१ते ८० टक्के गुण मिळवणारे १७ विद्यार्थी आहेत. या परीक्षेत तर अनुजा टिपरे हिने ९५.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक मिळवला आहे, तर मुकूल आचवल याने ९३.८ टक्के व सलोनी खन्ना हिने ९३.४ टक्के गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे इंदिरानगर येथील केंब्रिज स्कूलमध्ये सोहम गायकवाड यानेही ९५.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक पटकावला, तर श्रृती पवार हिने ९५.४ व प्रेक्षा फडके हिने ९४ टक्के गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
केंब्रिज स्कूलनेही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून, शाळेच्या परीक्षेला बसलेल्या सर्व ६८ विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत यश संपादन केले आहे. वडनेर गेटच्या आर्टिलरी सेंटर येथील केंद्रीय विद्यालयाचाही बारावीचा आर्टस, सायन्स, कॉमर्स या तिन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के निकाल लागला असून, सायन्सचे ३०, आर्टसचे ११ व कॉमर्सचे २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सायन्सचा चिराग बेहराने ९१.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून, निशांतसिंगने ८९.६० टक्के व शिवानी बोरसे हिने ८७ टक्के गुण मिळवत प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाचे यश मिळवले आहे. आर्टस शाखेत पूजा डागर हिने ८९.२२ टक्के, सोनाली गायकरने ८८.६० टक्के, तर मुस्कान गलिवालने ८५.८० टक्के गुण मिळवले आहेत. कॉमर्स शाखेत नेहा सिंगने ८३.६० टक्के प्रियंका महालेने ८०.४० टक्के गुण मिळवले आहेत.