७७६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:17 AM2017-09-26T00:17:39+5:302017-09-26T00:17:45+5:30
स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत महाराष्टÑ राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातून शहरात ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रत्यक्ष प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.
नाशिक : स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत महाराष्टÑ राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातून शहरात ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रत्यक्ष प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. शहरात स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार, त्याबाबत सर्व्हे करण्यात आला असता, पोलीस आयुक्तालयाकडून ३४३ ठिकाणी ११०६ सीसीटीव्ही कॅमेरे, तर नाशिक महापालिकेने ४३३ ठिकाणी १८४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित केले आहे. शहरात एकूण ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल प्रकल्पाच्या एकूण खर्चासह आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तयार केला जाणार आहे आणि त्यानंतर तो भागधारक-हितधारकांपुढे सादर केला जाणार आहे. दरम्यान, स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत शहरात आॅप्टिकल फायबर केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार असून, त्याच्या लांबीबाबत महाआयटीचे तज्ज्ञ पथक काम करत आहे. याशिवाय, कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरचीही निर्मिती केली जाणार आहे. तसेच स्मार्ट सिटी आॅपरेशन सेंटरही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नियोजित आहे. या साºया प्रकल्पासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. महापालिका व पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संयुक्तरीत्या सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार आहे.