चिंचोली  गावात सीसीटीव्ही अन् वायफाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:54 PM2018-06-22T14:54:24+5:302018-06-22T14:54:24+5:30

नायगाव - दत्ता दिघोळे - गावात घडणाऱ्या विविध दुर्घटना वारंवार घडणारे चोरीचे प्रकार, महिलांची सुरिक्षतता आदीं गोष्टींपासुन सुटका होऊन गावातील शांतता अबाधीत राहण्यासाठी संपुर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगरानीत आणणारी व वायफाय सेवा देणारी सिन्नर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

CCTV and Wifi in Chincholi village | चिंचोली  गावात सीसीटीव्ही अन् वायफाय

चिंचोली  गावात सीसीटीव्ही अन् वायफाय

googlenewsNext

नायगाव - दत्ता दिघोळे - गावात घडणाऱ्या विविध दुर्घटना वारंवार घडणारे चोरीचे प्रकार, महिलांची सुरिक्षतता आदीं गोष्टींपासुन सुटका होऊन गावातील शांतता अबाधीत राहण्यासाठी संपुर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगरानीत आणणारी व वायफाय सेवा देणारी सिन्नर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. नाशिकरोड येथील नाशिक व्हीजन नेक्स्ट रोटरी क्लब यांच्या सहकार्याने चिंचोली ग्रामपंचायतीच्या वतीने स्मार्ट व्हीलेज संकल्पना राबविण्यासाठी अत्यावश्यक असलेली गावातील शांतता अबाधीत ठेवण्यासाठी संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगरानीत ठेवणारी व शालेय विद्यार्थ्यांना मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासुन चिंचोलीगाव व शिवारात गावाच्या शांततेचा भंग करणा-या घटना वारंवार घडत असल्याने त्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कँमेरे बसविण्या सारखी उपाययोजना करण्याचे ठरवले. गावातील सर्व प्रमुख रस्ते ,चौक,सार्वजनिक ठिकाणे व गावातील प्रत्येक घर सीसीटीव्हीच्या निगराणीत कसे येईल या दृष्टीने उच्च प्रतिचे १२० सीसीटीव्ही कँमेरे बसवुन गावातील घडणार्या चोºयांसह विद्यार्थी -महिला आदींची सुरक्षितता आदीसह वारंवार घडणारे अनुचित प्रकार थांबविण्यास मदत होणार आहे.  सुमारे दहा लाख रूपये खर्चुन बसविलेल्या सीसीटीव्ही कँमे-यांबरोबर रोटरी क्लबने गावातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत वायफाय सेवा सुरू केली आहे.

Web Title: CCTV and Wifi in Chincholi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक