गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत ; आडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 05:03 PM2018-09-07T17:03:49+5:302018-09-07T17:03:55+5:30

नाशिक : गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल असे प्रतिपादन सहायक पोलीस उपायुक्त अरविंद आडके यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आयोजित गणेशोत्सव मंडळ बैठकीत केले़

CCTV cameras installed by Ganeshotsav Mandals to help maintain law and order; Impact | गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत ; आडके

गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत ; आडके

Next
ठळक मुद्देइंदिरानगर पोलीस ठाण्यात गणेशोत्सव बैठक

नाशिक : गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल असे प्रतिपादन सहायक पोलीस उपायुक्त अरविंद आडके यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आयोजित गणेशोत्सव मंडळ बैठकीत केले़

आडके यांनी सांगितले की, सीसीटीव्हीमुळे लक्ष ठेवणे सोपे जाईल तसेच जबरदस्तीने वर्गणी मागितल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल़ तसेच श्रींचे आममन विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, याउपरही डीजे वापर केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़ श्री गणेशाची मूर्ती व मंडपाची देखरेख करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करावी, रात्री दहा वाजे नंतर लाऊड स्पीकर किंवा वाद्य वाजवण्यास बंदी आहे़ गणेशोत्सव मंडळांनी अग्निशामक दल, महापालिका, महावितरण, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्याचे आवाहन आडके यांनी केले़

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे प्रास्ताविकात गतवर्षी दोन मंडळावर डीजे लावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगितले़ यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक आबा पाटील ,लोहकरे ,धारराव ,मोहिते ,बीबी गायकवाड ,उपस्थित होते़

या बैठकीस माजी नगरसेवक मामा ठाकरे, संतोष कमोद ,जयवंत टक्के, योगेश दिवे, अरुण मुन्नशेट्टीवार, सुनील राऊत ,अनिकेत सोनवणे ,रोहित परब, महेश थोरात, यासह मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: CCTV cameras installed by Ganeshotsav Mandals to help maintain law and order; Impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.