शांतीनगर त्रिफुली येथे सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:14 PM2017-08-20T23:14:01+5:302017-08-21T00:21:01+5:30

येथील व्यावसायिक पवन टर्ले यांच्या सहकार्याने निफाड पोलिसांनी शांतीनगर त्रिफुली येथे तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

 CCTV cameras at Shantinagar Trifulli | शांतीनगर त्रिफुली येथे सीसीटीव्ही कॅमेरे

शांतीनगर त्रिफुली येथे सीसीटीव्ही कॅमेरे

Next

निफाड : येथील व्यावसायिक पवन टर्ले यांच्या सहकार्याने निफाड पोलिसांनी शांतीनगर त्रिफुली येथे तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.येथील सामाजिक कार्यकर्ते पवन टर्ले यांनी ३५००० रुपये खर्च करून तीन सीसीटीव्ही कॅमेरे निफाड पोलीस ठाण्याला भेट देऊन वाहनांची वर्दळ असलेल्या शांतीनगर त्रिफुलीवर बसविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची मागणी मान्य करीत पोलीस उपअधीक्षक दीपक गिºहे व निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही कॅमेरे त्रिफुली परिसरात बसवण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे, निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे, देवदत्त कापसे, पवन टर्ले, दीपक गाजरे, तन्वीर राजे, बाळासाहेब रंधवे, सदाशिव कुंदे आदी उपस्थित होते. शहरातील शांतीनगर त्रिफुलीवरून नाशिक, औरंगाबाद, गुजरात, पिंपळगांव बसवंत, चांदवड, लासलगावकडे ये-जा करणाºया वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच त्रिफुली पसिरात स्टेट बँक आॅफ इंडिया, निफाड अर्बन बँक, दत्ताजी पाटील को-आॅप. बँक, जिल्हा बँक, जिल्हा माध्यमिक शिक्षक बँक, अशोकराव बनकर पतसंस्था यासह इतर बँका असल्याने नागरिकांची गर्दी होत असते या त्रिफुलीवरून जेवढी वाहने ये-जा करतील ती सर्व वाहने या कॅमेºयांच्या टप्प्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनधिकृतपणे गौणखनिजांची वाहतूक करणारी वाहने या कॅमेºयात टिपली जाणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन तसेच तहसील प्रशासन यांना हे कॅमेरे मदतगार ठरणार आहेत. तीनही कॅमेºयाचे चित्रीकरण निफाड पोलीस ठाण्यात लाइव्ह बघता येणार आहे. पवन टर्ले यांनी हे कॅमेरे भेट देऊन सामाजिक योगदान दिल्याबद्दल त्यांचे निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिºहे,पोलीस निरीक्षक रणजित डेरे व मान्यवरांनी कौतुक केले.

 

Web Title:  CCTV cameras at Shantinagar Trifulli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.