देवळा बसस्थानकात सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:37 AM2018-04-15T00:37:44+5:302018-04-15T00:37:44+5:30
देवळा : येथील बसस्थानकावर परिवहन महामंडळाच्या तिसऱ्या डोळ्यामुळे रोडरोमिओंसह सोनसाखळी चोरांना मोठा आळा बसला आहे.
देवळा : येथील बसस्थानकावर परिवहन महामंडळाच्या तिसऱ्या डोळ्यामुळे रोडरोमिओंसह सोनसाखळी चोरांना मोठा आळा बसला आहे. देवळा बसस्थानकाची रचना पूर्वीपासूनच चांगल्या पद्धतीने झाली असल्याने संपूर्ण नासिक जिल्ह्यात खड्डेमुक्त बसस्थानक म्हणून वीस ते पंचवीस वर्षांपासून ख्याती आहे. विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गा पासून १०० मीटर अंतरावर असलेल्या देवळा बसस्थानकात दिवसभरात ४५० बसेसची ये-जा सुरू असते. देवळा शहर हे चौफुलीवर वसलेले तालुक्याचे गाव आहे. येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते . तालुक्याच्या ग्रामीण भागातून विद्यार्थिनी महाविद्यालयीन व शालेय शिक्षणासाठी नियमितपणे देवळा येथे येतात. या विद्यार्थिनी देवळा बसस्थानक ते महाविद्यालय या मार्गावरून पायी जात असताना शहरातील काही टवाळखोर रोडरोमिओ त्यांच्यावर शेरेबाजी करणे, दुचाकी वेगाने चालवत हॉर्न वाजविणे, त्यांचा घरापर्यंत पाठलाग करून सतावणे आदी प्रकार सातत्याने करत असतात.