सीसीटीव्हीत कैद होऊनही सापडेना गुन्हेगार पोलीस तैनात : नगरसेवकांच्या मोटारींची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:52 AM2018-04-07T00:52:49+5:302018-04-07T00:52:49+5:30
इंदिरानगर : येथील राजीवनगर व रथचक्र चौक परिसरात राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांच्या चारचाकी वाहनांच्या चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़
इंदिरानगर : येथील राजीवनगर व रथचक्र चौक परिसरात राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांच्या चारचाकी वाहनांच्या चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ प्रभाग क्रमांक ३०चे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या या चारचाकी असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, समाजकंटक सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, त्यांच्या शोधासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजीवनगरमधील रहिवासी तथा प्रभाग क्रमांक ३०चे नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या घराबाहेर उभी असलेल्या इनोव्हा कारच्या (एमएच १५ डीवाय ६३६०) तसेच रथचक्र चौकातील साईश्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी नगरसेवक दीपाली कुलकर्णी याच्या वोक्सवॅगन वेन्टो (एमएच १५ ईएक्स ६६५५) कारच्या गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केले़ दोन दुचाकींवरून आलेल्या या चार समाजकंटकांच्या हातात लाकडी दांडे होते़ पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे व पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ सकाळी ही वार्ता परिसरात पसरताच नागरिक व कार्यकर्त्यांनी नगरसेवकांच्या घरी गर्दी केली होती़ परिसरात दहशत निर्माण करणाºया या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नगरसेवक सतीश सोनवणे यांनी प्रभाग ३० मधील कायदा व सुव्यवस्था तसेच परिसर भयमुक्त व्हावा यासाठी स्वखर्चाने चौकांमध्ये सुमारे २७ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत़ परंतु त्यांच्याच मोटारींच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले आहेत तरीही पोलिसांना ते सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.