सीसीटीव्हीत बिबट्या कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:20 AM2017-08-30T00:20:22+5:302017-08-30T00:21:13+5:30

महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. तसेच या भागातील एका फार्महाउसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा संचारही कैद झाला आहे. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेºयात स्पष्ट दिसतो. डावा कालव्याचा मळे परिसर सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आला असून, शेतकरीवर्गावर भीतीचे सावट पसरले आहे.

 CCTV footage leopard | सीसीटीव्हीत बिबट्या कैद

सीसीटीव्हीत बिबट्या कैद

Next

अझहर शेख।
नाशिक : महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. तसेच या भागातील एका फार्महाउसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा संचारही कैद झाला आहे. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेºयात स्पष्ट दिसतो. डावा कालव्याचा मळे परिसर सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आला असून, शेतकरीवर्गावर भीतीचे सावट पसरले आहे. गोदाकाठालगत बिबट्याचा वावर नवीन नसला तरी थेट मानवी वस्तीजवळ बिबट्या येणे हे मात्र धोक्याचे मानले जात आहे. गंगापूररोड-गिरणारे रस्त्यावरील महादेवपूर ते मखमलाबादजवळील गंगावाडी परिसर अन् पुढे थेट मेरीपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ वाढत आहे. वन्यजीव असलेला मार्जार कुळातील बिबट्याची अन्नसाखळी संपुष्टात आल्यामुळे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत संघर्ष करीत आहेत. त्याचा हा संघर्ष आता महादेवपूरपासून तर थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्यालगतही दिसू लागला आहे. या भागातील शेतकरी यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकºयांच्या पशुधन तसेच मजुरांवर हल्ला करण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच बिबट्याचा वाढता संचार धोक्याचा मानला जात आहे. येथील मळे परिसरात शेतकरी व त्यांचे शेतमजुरांची घरे आहेत. महादेवपूर जवळील आभाळवाडी, दरी-मातोरी, मुंगसरा, मनोली, चांदशी, गंधारवाडी, मखमलाबाद शिवारापासून पुढे मेरीपर्यंत बिबट्याचा संचार वाढला आहे.  गंधारवाडी, मखमलाबाद, दुगाव-मुंगसरा परिसर, मनोली परिसर, जलालपूर शिवारात वनविभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करून पिंजरे तैनात केले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली. या भागात कु त्रे, डुकरे, रानडुक्कर, रान ससे यांच्या वाढत्या संख्येमुळे बिबट्याला येथे भक्ष्य सहज उपलब्ध होत असल्याने तसेच पाटाला पाणी असल्यामुळे बिबट्याचा या परिसरात वावर वाढला आहे.

Web Title:  CCTV footage leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.