सीसीटीव्ही, रखवालदारांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:10 PM2020-02-08T23:10:12+5:302020-02-09T00:27:06+5:30

इंदिरानगर : इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी जागरूकता दाखवित पोलिसांच्या भरवशावर न राहता, स्वत:च स्वत:च्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार ...

CCTV, a priority for the custodians | सीसीटीव्ही, रखवालदारांना प्राधान्य

सीसीटीव्ही, रखवालदारांना प्राधान्य

Next
ठळक मुद्दे गुन्हेगारीवर नियंत्रण। मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

इंदिरानगर : इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी जागरूकता दाखवित पोलिसांच्या भरवशावर न राहता, स्वत:च स्वत:च्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला असून बंगले, कॉलनी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच काही ठिकाणी रखवालदारांची नेमणूक केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळविण्याबरोबच रखवालदारांमध्ये परिसराची स्वच्छता राखण्यास मदत होऊ लागली आहे.
सुमारे ४५ वर्षांपूर्वी बंगल्यांची कॉलनी व सोसायटी म्हणून इंदिरानगरची ओळख होती. त्यात आता मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उंच इमारतीही उभ्या राहिल्या आहेत. विशेष करून नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भरणा असलेल्या या भागातील अनेक रहिवाशांची मुले बाहेरगावी वा परदेशात नोकरी, शिक्षणासाठी स्थायिक झाल्याने कुटुंबात फक्त ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य राहिले
आहे.
अशा परिस्थितीत त्यांच्याकडून बंगल्यांची देखभाल करणे अवघड झाले असून, जीविताच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर उपाय म्हणून बंगल्याच्या आवारातच रखवालदाराची नेमणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. स्वत:च्या संरक्षणाच्या दृष्टीने बंगल्याच्या परिसरातच छोटी रूम बांधून रखवालदाराची सोय करण्यात आली आहे.
तर मोठ्या सोसायट्यांचा परिसर असलेल्या राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, वासननगर, विनयनगर, साईनाथनगर, सार्थकनगर, समर्थनगर, दीपालीनगर, सुचितानगर, कलानगर या भागातील अपार्टमेंट आणि सोसायट्यांच्या वाहनतळाच्या जागेतदेखील रखवालदारांच्या नेमणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे. रखवालदारांमुळे येणाºया-जाणाºया व्यक्तीची विचारपूस केली जात असून, त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या वावरावर निर्बंध बसले आहेत.
रखवालदाराच्या नेमणुकीबरोबरच त्याच्या कुटुंबीयांनाही परिसरात रोजगार उपलब्ध होत आहे. असाच प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बाबतीत झाला आहे. इंदिरानगर परिसरात ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तसेच अनेक सोसायट्या, कॉलनींमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात आल्याचे फलक लावण्यात आल्यामुळे गुन्हेगारांना काही प्रमाणात आळा बसला असून, इमारतीच्या तळमजल्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या स्पेअरपार्टची चोरी, वाहन चोरी आदी किरकोळ चोºयांच्या घटनेमध्ये कमालीची घसरण झाली आहे.
बंगले, अपार्टमेंटमध्ये रखवालदारांच्या निवासी नेमणुकीमुळे परिसराची स्वच्छता राखण्यास मदत होत असून, दिवसभर रखवालदारांच्या कुटुंबाचे सोसायटी, बंगल्यांकडे लक्ष राहत असल्यामुळे अनोळखी व्यक्तींची विचारपूस केल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जात नाही. सीसीटीव्ही कॅमेºयांमुळेदेखील अनेक बंगले, सोसायट्यातील रहिवासी निर्धास्त झाले आहेत.

Web Title: CCTV, a priority for the custodians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.