जिल्हा परिषदेत लवकरच सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:46 AM2018-03-15T00:46:30+5:302018-03-15T00:46:30+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, साधारणपणे पुढील महिन्यात या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदाप्रक्रियादेखील राबविण्यात आली होती. सदर प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच जिल्हा परिषदेच्या कामकाजावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या दालनात लावण्यात येणाºया कॅमेºयामुळे काही अधिकाºयांनी नाराजी दर्शविली असून, अधिकाºयांवर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

CCTV soon after Zilla Parishad | जिल्हा परिषदेत लवकरच सीसीटीव्ही

जिल्हा परिषदेत लवकरच सीसीटीव्ही

Next
ठळक मुद्दे निविदा प्रक्रिया पूर्ण दालनात कॅमेरे लावण्याबाबत नाराजी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, साधारणपणे पुढील महिन्यात या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदाप्रक्रियादेखील राबविण्यात आली होती. सदर प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच जिल्हा परिषदेच्या कामकाजावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या दालनात लावण्यात येणाºया कॅमेºयामुळे काही अधिकाºयांनी नाराजी दर्शविली असून, अधिकाºयांवर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेतील कामकाज आणि ठेकेदारांची कामे यामुळे अनेकदा वाद तसेच आरोप-प्रत्यारोपाच्या घटना घडत असतात. मध्यंतरी एका अभियंत्याच्या दालनात जिल्हा परिषद सदस्य आणि संबंधित अधिकाºयांमध्ये चांगलाच वाद झाला होता. ठेकेदार तसेच ग्रामसेवक यांचे अनेकदा अधिकाºयांबरोबर होणारे वाद हेही जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय आहे. काही वर्षांपूर्वी एका अधिकाºयाच्या अंगावर शाई फेकण्याचादेखील प्रकार घडला होता. अशा वादाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीची आवश्यकता वारंवार प्रतिपादित करण्यात आली होती. आता या साºया प्रकारांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.
जिल्हा परिषदेत लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून जुन्या आणि नव्या इमारतींवर तसेच कार्यालयीन हॉल, कार्यालयांबाहेरील लॉबी, आवार तसेच वाहतळात कॅमेरे तैनात केले जाणार आहे. पारदर्शक कामकाज होण्यास मदतअधिकाºयांच्या दालनातदेखील कॅमेरे लावण्यात येणार असून, यामुळे पारदर्शक कामकाज होण्यास मदत होणार आहे. अनेकदा अधिकाºयांच्या दालनात जाऊन शिष्टमंडळ, आंदोलनकर्ते अधिकाºयांवर आरोप करीत असतात. त्यांच्या हालचालीही आता टिपल्या जाणार आहेत. असे असले तरी काही अधिकाºयांनी दालनात कॅमेरे लावण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यामुळे अधिकाºयांच्या व्यक्तिगत आयुष्यावर गदा येणार असून, कामकाजात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे किंबहुना केवळ दालनात कुणी आल्या-गेलेल्यांवर नजर ठेवली तरीही अनेक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याची शंका अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.

Web Title: CCTV soon after Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.