कुशावर्तवर राहणार सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:56 AM2018-08-11T00:56:19+5:302018-08-11T00:57:28+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेत बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कुशावर्त परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना त्यांनी मंदिर प्रशासनाला देतानाच परिसरातील अतिक्रमणेही हटविण्याचे आदेश दिले. कुंभमेळ्याप्रमाणेच श्रावणी सोमवारचेही नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेत बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कुशावर्त परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना त्यांनी मंदिर प्रशासनाला देतानाच परिसरातील अतिक्रमणेही हटविण्याचे आदेश दिले. कुंभमेळ्याप्रमाणेच श्रावणी सोमवारचेही नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
येत्या रविवारपासून श्रावणमासास प्रारंभ होणार आहे. श्रावण महिन्यात चारही सोमवारी भाविकांची मोठी गर्दी लोटण्याचा अंदाज आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी आढावा बैठक घेऊन तेथील अडचणी तसेच उपाययोजना जाणून घेतल्या. प्रशासकीय तयारीसंबंधीही त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीत बोलताना जिल्हाधिकाºयांनी सांगितले, श्रावण महिन्यात होणारी गर्दी लक्षात घेता सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करत सतर्क राहावे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. त्याच बरोबर त्र्यंबकेश्वरचे सौंदर्य व पावित्र्यही राखले गेले पाहिजे. श्रावणी सोमवारी कुशावर्त तीर्थावर भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे कुशावर्त तीर्थाचा भाग हा सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आणावा. त्यासाठी मंदिर प्रशासनाने या भागात त्वरित सीसीटीव्ही लावण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. नगरपरिषदेने स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना करावी.
श्रावण महिन्यात रविवार आणि सोमवार ह्या दोन्ही दिवशी मांसाहार विक्री बंद ठेवण्यात यावी. याबाबत पोलीस पथकांनी सतर्क राहून परिसरातील ढाबे तसेच हॉटेलवर छापे मारून कारवाई करावी, असेही आदेश दिले. परिसरात प्लॅस्टिकचा वापर टाळावा. ब्रह्मगिरी, गंगाद्वार याठिकाणी प्रदक्षिणादरम्यान मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक आढळून येते. प्लॅस्टिक वापरणाºया भाविकांना दंड आकारून महत्त्वाच्या भागांमध्ये नगरपरिषदेतर्फे स्टॉल लावून जनजागृती करावी.
भाविकांना कागदी पिशव्यांचे वाटप करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या. बैठकीला नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, तहसीलदार महिंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पोलीस निरिक्षक रवींद्रकुमार सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना केरु रे, वनविभागाचे कैलास अहिरे, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेते समीर पाटणकर, नगरसेवक विष्णू दोबाडे, त्रिवेणी तुंगार, माधवी भुजंग, सायली शिखरे,समीर वैद्य, एसटीचे शरद झोले आदी उपस्थित होते.
अधिकाºयांची कानउघडणी
बैठक आटोपल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी प्रांताधिकारी राहुल पाटील, ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन गोरे यांच्या समवेत कुशावर्तावर जाऊन पाहणी केली. कुशावर्तावर असलेल्या अतिक्रमणाबाबत त्यांनी अधिकाºयांची कानउघडणी केली. तेथील टपºया काढण्यास भाग पाडले. स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबतही त्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व पालिकेला तंबी दिली.