सीसीटीव्हीमुळे गैरप्रकारांना बसणार आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:07+5:302021-06-16T04:19:07+5:30

सिन्नर: शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील उपनगरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार आहे. यामुळे ...

CCTV will prevent malpractice | सीसीटीव्हीमुळे गैरप्रकारांना बसणार आळा

सीसीटीव्हीमुळे गैरप्रकारांना बसणार आळा

googlenewsNext

सिन्नर: शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील उपनगरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार आहे. यामुळे महिला व नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. नगरसेवक पंकज मोरे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.

सिन्नर शहरात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आला आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शांतीनगरातील नगरसेवक मोरे यांच्या कार्यालयाजवळ उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------

या उपनगरांवर सीसीटीव्हीची नजर..

अजिंक्यतारा, सरदवाडी मार्गावरील उपनगरांची महत्त्वाची बाजारपेठ बनला आहे. येथील मुख्य चौक गजबजलेला असतो. शांतीनगर, मॉडर्न कॉलनी, यशवंतनगर, जय मल्हार कॉलनी, झापवाडी, आदी उपनगरांतील महत्त्वाचे रस्ते, चौक सीसीटीव्हीच्या टप्प्यात असतील. उपनगरांतील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा सीसीटीव्हीच्या टप्प्यात येणार आहेत.

---------------------------

३६० अंशात फिरणार कॅमेरे

सीसीटीव्ही कॅमेरे ३६० अंशात फिरू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसा १०० व रात्री ३० मीटरपर्यंत चोवीस तास कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. मोरे यांच्या संपर्क कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सर्व कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. दूरचे चित्रही स्पष्ट दिसू शकेल अशी क्षमता कॅमेऱ्यात आहे.

---------------

सिन्नर शहरातील प्रभाग १२ मध्ये नगरसेवक पंकज मोरे यांच्या स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, पंकज मोरे, शैलेश नाईक, गोविंद लोखंडे आदी. (१५ सिन्नर सीसीटीव्ही)

===Photopath===

150621\15nsk_6_15062021_13.jpg

===Caption===

१५ सिन्नर सीसीटीव्ही

Web Title: CCTV will prevent malpractice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.