सटाण्याच्या देवमामलेदार यात्रोत्सवावर सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 04:19 PM2019-12-21T16:19:18+5:302019-12-21T16:19:28+5:30
सटाणा : येथील श्री संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यात्रोत्सव उत्साहात पार पडावा यासाठी देवमामलेदार देवस्थान विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली आहे.
सटाणा : येथील श्री संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यात्रोत्सव उत्साहात पार पडावा यासाठी देवमामलेदार देवस्थान विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली आहे. यात्रोत्सवासाठी राज्य तसेच परराज्यातून दाखल होणारे भाविक, यात्रेकरू व व्यापार्?यांना विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच देवस्थान समिती सज्ज झाली आहे.देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसर व यात्रोत्सव परिसरावर ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेरांचे संपुर्ण नियंत्रण यात्रोत्सवात उभारण्यात येणाऱ्या विशेष पोलिस चौकीत होणार आहे.
रविवारी (दि. २२) पासून देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवात अभूतपूर्ब उत्साहात सुरु वात होत आहे. त्या पाशर््वभूमीवर पालिका प्रशासन व देवस्थान ट्रस्टने शहरातील आरमनदी पात्रालगत असलेले मैदान स्वच्छ केले आहे. देवमामलेदारांच्या मंदिरावर तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असुन रंगरगोटी व स्वच्छता देखील पुर्ण झाली आहे. यात्रा पटांगणात अनेक वर्षापासून सांड पाणी साचत होते. त्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने भूमिगत गटार केल्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. त्यामुळे रोगराई पूर्णपणे मिटणार आहे. दरम्यान देवस्थान ट्रस्टतर्फे राज्य तसेच परराज्यातून येणार्?या व्यवसायिकांना दुकाने,पाळणे व इतर मनोरंजनात्मक दुकाने उभारण्यासाठी जागा वाटप करणे सुरू आहे. देवस्थानतर्फे तीनशेहून अधिक दुकानांसाठी जागा वाटप केली जाणार असून व्यावसायिकांकडून मात्र नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही याची देवस्थान काळजी घेत आहे. पालिका प्रशासनातर्फे यात्रोत्सवासाठी दरवर्षी 51हजार रूपये देवस्थान ट्रस्टला दिले जातात.
सटाणा पोलिस ठाण्यातर्फे यात्रा यात्रोत्सव काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच यात्रा परिसरात दिवसा व सायंकाळी महिला व तरु णींची छेडछाड होवू नये, चोरी व गैरप्रकार टाळण्यासाठी जायखेडा, वडनैर भैरव आदी पोलिस ठाण्यातुन अतिरिक्त कुमक पाचारण करण्यात आली आहे. यात पोलिस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, ५० पोलिस व २० महिला पोलिसांचा फौजफाटा दाखल होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून यात्रोत्सवातील कुस्ती दंगलीत महिला व तरु णी कुस्तीगीरांचा सहभाग बघता मोठ्या गर्दीचा अंदाज आहे. त्यामुळे कुस्ती दंगलीसाठी आरम नदीपात्रात विस्तीर्ण मैदान तयार केले जाणार आहे.