सीडीएम बंद, एटीएममध्ये खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 01:42 AM2021-12-20T01:42:53+5:302021-12-20T01:43:16+5:30
शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये दोन ते तीन दिवसांपासून खडखडाट दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना रोख रक्कम काढण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून, सीडीएम बंद असल्याने रोख रकमेचा भरणा करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रविवारी दिसून आले.
नाशिक : शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये दोन ते तीन दिवसांपासून खडखडाट दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना रोख रक्कम काढण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून, सीडीएम बंद असल्याने रोख रकमेचा भरणा करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रविवारी दिसून आले.
शहरातील बँक कर्मचारी गुरुवारी व शुक्रवारी संपावर असल्याने बहुतांश ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केल्याने अनेक मशिनमध्ये रोकडच नसल्याचे दिसून येत आहे. एटीएममधून रोख रक्कम मिळण्यात अडचणी येत असल्याने ग्राहकांना विविध मोबाइल ॲपच्या मदतीने डिजिटल पेमेंट करून व्यवहार करावे लागत आहेत. दरम्यान, एटीएमप्रमाणेच सीडीएमही बंद असल्याने ग्राहकांना रोख रकमेचा भरणा करण्यासाठी बँका सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे रविवारी दिसून आले.