येवल्यात बसंत पंचमी महोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:17 AM2021-02-25T04:17:58+5:302021-02-25T04:17:58+5:30
प्रारंभी कुलदेवता श्री चौंडेश्वरी मातेला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी सचिन वाव्हळ, रोशन आदमाणे, मनोज काळंगे, रुषाल खोंजे, सौरभ ...
प्रारंभी कुलदेवता श्री चौंडेश्वरी मातेला दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी सचिन वाव्हळ, रोशन आदमाणे, मनोज काळंगे, रुषाल खोंजे, सौरभ भागवत यांनी सपत्नीक पूजा केली. पूजेनंतर श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सामुदायिक पूजन, आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सालाबादाप्रमाणे यंदाही सचिन करंजकर यांनी श्री चौंडेश्वरी मातेस पैठणी साडी अर्पण केली, तर रमा झाडे यांनी लामण दिवा मंदिरास भेट दिला.
धार्मिक विधी व पूजापाठ जयंत शास्त्री ऊर्फ बंडू शास्त्री लक्ष्मण जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मनोज भागवत यांनी तर आभार अमोल असलकर यांनी मानले. कार्यक्रमास देवांग कोष्टी समाज बांधव, विश्वस्त मंडळ, समाज कार्यकारिणी मंडळ, महिला मंडळ आदी उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यातील धामणगाव येथे श्री चौंडेश्वरी मातेचे मंदिर उभारणीसाठी समाज बांधवांनी बसंत पंचमी निमित्ताने भूमिपूजन केले, तसेच नागडे येथेही देवांग कोष्टी समाजातर्फे बसंत पंचमी महोत्सव उत्सव साजरा करण्यात आला.
फोटो- २४ येवला बसंत पंचमी
येवला येथे देवांग कोष्टी समाजाच्यावतीने काढण्यात आलेली श्री चौंडेश्वरी मातेची पालखी.
===Photopath===
240221\24nsk_37_24022021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ येवला बसंत पंचमी येवला येथे देवांक कोष्टी समाजाच्यावतीने काढण्यात आलेली श्री चौंडेश्वरी मातेची पालखी.