पाच वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 12:08 AM2021-06-15T00:08:21+5:302021-06-15T00:08:50+5:30
घोटी : पाच वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सॅमसोनाइट कंपनीच्या सहकार्याने घोटी येथील नाहेडी डोंगरावर वृक्ष लागवड केली होती. सध्या ही झाडे चारपाच फूट उंचीची झाली आहेत.
घोटी : पाच वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सॅमसोनाइट कंपनीच्या सहकार्याने घोटी येथील नाहेडी डोंगरावर वृक्ष लागवड केली होती. सध्या ही झाडे चारपाच फूट उंचीची झाली आहेत.
दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जतन व संगोपन झालेल्या झाडांची सजावट करून, रंगरंगोटी करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
घोटीच्या नाहेडी डोंगराच्या पायथ्याशी सॅमसोनाइट कंपनीच्या मदतीने राजसैनिकांनी ४९० विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला होता. राजसैनिक व सॅमसोनाइट कंपनीचे कर्मचारी दरवर्षी ह्या वृक्षांना शेणखत टाकून उन्हाळ्यात पाणी घालत असत.
आजमितीला ह्या वृक्षांची उंची १० ते १२ फुटांपर्यंत वाढलेली आहे. पुन्हा मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या जन्मदिनी ४९० वृक्षांची सजावट करून पूजा केली व आदिवासी बालकांच्या हस्ते केक कापून त्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शुक्रवारी (दि.१४) पुन्हा ५३ नवीन रोपांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात मनसे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, सॅमसोनाइट कंपनीचे व्यवस्थापक महाजन जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, उपजिल्हाध्यक्ष आत्माराम मते, सरपंच रामदास आडोळे, तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, गणेश मुसळे, उपतालुकाध्यक्ष संजय सहाणे, रामदास चव्हाण, गिर्यारोहक काळू भोर, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके आदी उपस्थित होते.
(१४ घोटी १)