देवमामलेदार पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:31 AM2019-12-18T01:31:50+5:302019-12-18T01:32:15+5:30

श्री यशवंतराव महाराज देवमामलेदार यांच्या १३२व्या पुण्यतिथीनिमित्त सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या प्रेरणादायी उत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. यशवंतराव महाराज पटांगणावर नऊ दिवस चालणाºया या उत्सवात मंगलधून, गणेशपूजन, रुद्राभिषेक, पारायण, सत्संग, श्री यशवंत लीलामृत पारायण, भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Celebrate the celebration of the death anniversary | देवमामलेदार पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ

देवमामलेदार पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ झाला असून, यानिमित्ताने गोदा काठावरील देवमामलेदार मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई.

Next

नाशिक : श्री यशवंतराव महाराज देवमामलेदार यांच्या १३२व्या पुण्यतिथीनिमित्त सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या प्रेरणादायी उत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. यशवंतराव महाराज पटांगणावर नऊ दिवस चालणाºया या उत्सवात मंगलधून, गणेशपूजन, रुद्राभिषेक, पारायण, सत्संग, श्री यशवंत लीलामृत पारायण, भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुण्यतिथी उत्सवानिमित्त गोदाघाटावरील देवमामलेदार मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, संपूर्ण परिसराची स्वच्छतादेखील करण्यात आली आहे. या उत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व हस्तकला स्पर्धा घेण्यात आल्या. येत्या नऊ दिवसात विविध कार्यक्रम होणार असून, धार्मिक तसेच सांस्कृतिक सोहळ्यात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, मंगळवारीदेखील धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले
यशवंतराव महाराज पटांगणावर या उत्सवासाठी भव्य मंडप उभारला आहे. मंदिरात सोमवारी झालेल्या समाधीपूजनाच्या कार्यक्रमास श्री यशवंत व्यायाम मंदिराचे अध्यक्ष दीपक पाटील, अरुण वैद्य, श्री यशवंतराव महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रभाकर दशपुत्रे, संतोष कुलकर्णी, वामन देशपांडे, मनीष पाराशरे आदी उपस्थित होते.

Web Title: Celebrate the celebration of the death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.