चक्र धर स्वामी अवतार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:24 IST2020-08-27T17:22:26+5:302020-08-27T17:24:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क येवला : अंगणगाव येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात श्री चक्र धर स्वामी अवतार दिन अष्ट शताब्दी वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले.

चक्र धर स्वामी अवतार दिन साजरा
ठळक मुद्देया सोहळ्यास महानुभव पंथीय भाविक उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : अंगणगाव येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात श्री चक्र धर स्वामी अवतार दिन अष्ट शताब्दी वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले.
यानिमित्ताने श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात १०८ दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री चक्र धर स्वामी पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन यावेळी करण्यात आले. श्रीकृष्ण ज्ञान मंदिरातील दत्तराज बाबा चिरडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास महानुभव पंथीय भाविक उपस्थित होते.
(फोटो २७ येवला)