एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत बालकांचा अन्नप्राशन दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 02:22 PM2020-06-28T14:22:39+5:302020-06-28T14:23:05+5:30

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत रायमाळ वस्ती अंगणवाडी केंद्रात नुकताच सहा महिने पूर्ण झालेल्या ...

Celebrate Children's Food Day under Integrated Child Development Project |  एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत बालकांचा अन्नप्राशन दिवस साजरा

 एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत बालकांचा अन्नप्राशन दिवस साजरा

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्स

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत रायमाळ वस्ती अंगणवाडी केंद्रात नुकताच सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांचा अर्धवार्षिक वाढदिवस (अन्नप्राशन) साजरा करण्यात आला.
यावेळी स्तनदा मातांना कार्यक्र म साजरा करण्याचा उद्देश व हेतू सांगण्यात आला. बाळ जन्मल्यापासून बाळाला निव्वळ स्तनपान केले जाते व सहा महिन्यांनंतर बाळाला स्तनपानासोबत वरच्या पूरक आहाराची गरज असते. यासाठी माता सक्षमीकरण व बळकटीकरण, आहाराची मात्रा समजावून सांगण्यात येते की, बाळाला मऊसर शिजलेले अन्न, घनघट्ट प्रमाणात भरविणे तसेच हिरव्या पालेभाज्यांचे सूप तसेच अंडी, दूध, मांसाहार खाऊ घालावा, कोणतेही पथ्य पाळू नये. आपल्या रोजच्या आहारातील सर्व प्रकारच्या पदार्थांची चव कळावी यामुळे बाळ सुदृढ होऊन संसर्गजन्य आजारापासुन बचाव होतो व कुपोषण कमी होण्यास मदत होते. आहार शिजविण्यापूर्वी व बाळाला आहार भरविण्यापूर्वी हातांची स्वच्छता ठेवणे अशा प्रकारे मातांना मार्गदर्शन करण्यात आले.
सद्यस्थितीला कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्स ठेवून कार्यक्र म साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका कुसूम अस्वले यांनी बाळाचे औक्षण करून त्याला पूरक पोषण आहार भरविण्यात आला. यावेळी बाळाची माता साधना भुसाळ, अंगणवाडी मदतनीस सुनीता गांगुर्डे, सुनंदा उफाडे, मंदाबाई गांगुर्डे, शिला गांगुर्डे, अनिता उफाडे, भावना गांगुर्डे आदींसह स्तनदा माता उपस्थित होत्या.

Web Title: Celebrate Children's Food Day under Integrated Child Development Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.