विश्वकल्याणाची प्रार्थना करीत नाताळ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:55+5:302020-12-26T04:12:55+5:30
नाशिकरोड परिसरात ख्रिस्ती बांधवांची संख्या लक्षणीय असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून नाताळ साजरा करायला सुरुवात केली. चर्चमध्ये नाताळच्या आदल्या ...
नाशिकरोड परिसरात ख्रिस्ती बांधवांची संख्या लक्षणीय असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून नाताळ साजरा करायला सुरुवात केली. चर्चमध्ये नाताळच्या आदल्या मध्यरात्री प्रार्थना सभा, प्रभू येशूची गीते (कॅरोल) होतात. भाविकांची थंडीतही गर्दी होते. यंदा कोरोनामुळे हे चित्र नव्हते. जेलरोड येथील संत अण्णा महाचर्च, नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू मंदिर, वास्को चौकाजवळील सेंट फिलिप चर्चमध्ये सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले. भाविकांना आनलाइन संदेश देण्यात आला. चर्चबरोबरच शाळांमध्ये व घरोघरी रोषणाई तसेच प्रभू येशू जन्मावरील देखावा तयार करण्यात आला होता.
चौकट===
सामाजिक उपक्रम
गरिबांना दानधर्म, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, निराधारांना आधार आणि गरजूंना मदत ही प्रभू येशूची शिकवण आहे. त्याप्रमाणे यंदा नाताळ साध्या पद्धतीने करताना विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ सणावर होणारा खर्च टाळून तो निधी गरीब नागरिक, रुग्ण, बेरोजगार यांना देण्यात येणार आहे. गेल्या दहा महिन्यांपासून संत अण्णा महामंदिरात अन्नदान सुरू असून, ख्रिस्ती बांधव गरिबांना किराणा पोहोचवत आहेत.