संविधान दिन उत्साहात

By admin | Published: November 27, 2015 10:27 PM2015-11-27T22:27:24+5:302015-11-27T22:32:27+5:30

विविध कार्यक्रम : ठिकठिकाणी संविधान पूजन; सामूहिक वाचन

Celebrate the day of the Constitution | संविधान दिन उत्साहात

संविधान दिन उत्साहात

Next

पेठे विद्यालय :
नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा झाला. मुख्याध्यापक गीता कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, पर्यवेक्षक प्रियंका निकम, कुंदा जोशी, कैलास पाटील, शिक्षक प्रतिनिधी शैलेश पाटोळे, शर्मिला खानीवाले उपस्थित होते. यशोदीप जाने, भावेश पाटील या विद्यार्थ्यांनी राज्यघटनेविषयी भाषणे केली. शिक्षक भरत भलकार यांनी ‘राज्यघटनेची निर्मिती ते सर्वसामान्यांचा संबंध’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक प्रियंका निकम यांनी संविधान प्रतिज्ञा दिली. केतन खेंगले याने सूत्रसंचालन केले. रुपाली धारणे यांनी आभार मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच :
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त जेलरोड येथून फेरीचे आयोजन करण्यात आले. भीमनगर, कन्या शाळा, डॉ. आंबेडकर पुतळा यामार्गे फेरी नाशिकरोडला पोहोचली. नाशिकरोड बुद्धविहारात डॉ. आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा कर्मवीर दादासाहेब गायकवाड कार्यकर्ता व कर्मयोगिनी शांताबाई दाणी समाजसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांत जगदीश गोडसे, संघमित्रा मेंढे, रूपा साळवे, गीताई कन्या छात्रालय, भास्कर बर्वे, कवी रंगराज ढेंगळे यांचा समावेश होता. यावेळी मंचाचे अध्यक्ष अरुण शेजवळ, प्रशांत पगारे, तक्षशील चव्हाण, राजाभाऊ जगताप, नीलेश सोनवणे, वंदना गायकवाड, कुसुम मेढे आदि उपस्थित होते.
भीमशक्ती सामाजिक संघटना :
नाशिक : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते शाहू खैरे, प्रमुख पाहुणे म्हणून गं. पां. माने, अविनाश अहेर, सुनंदा मोरे हे मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नूर सय्यद, सूत्रसंचालन चंद्रकांत बोंबले, आभार प्रदर्शन भरत अहेर यांनी केले. सदर प्रसंगी भारतीय राज्यघटनेच्या गौरवास्पद रंजना नेरकर, रेखा शेलार, तुळशीराम शिंदे यांची भाषणे झाली.

Web Title: Celebrate the day of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.