प्रहार संघटनेच्या वतीने अपंग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:05+5:302020-12-06T04:14:05+5:30

तालुक्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिले. तसेच तहसीलदार शरद घोरपडे यांनी ...

Celebrate Disability Day on behalf of Prahar Association | प्रहार संघटनेच्या वतीने अपंग दिन साजरा

प्रहार संघटनेच्या वतीने अपंग दिन साजरा

Next

तालुक्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिले. तसेच तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिव्यांग बांधवांना योजनांची माहिती व मार्गदर्शन केले. सुभाष कराड यांनी दिव्यांग बांधवांविषयी मनोगत व्यक्त केले. प्रहार दिव्यांग संघटनेचे निफाड तालुका उपाध्यक्ष सोमनाथ धुमाळ यांनी संजय गांधी योजनेचा निधी हा दर महिन्याला विधवा, निराधार व दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा व्हावा तसेच अंत्योदय कार्ड हे प्रत्येक दिव्यांग बांधवांना मिळावे, अशी मागणी केली. यावेळी दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष विकास खडताळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, जयेश जगताप, अमोल ब्राह्मने, सनी गोसावी, संदीप क्षीरसागर, गणेश राजोळे, अशोक पवार, सुभाष जाधव, संजय शिंदे, विलास गायकवाड, संदीप भुजबळ, मछिंद्र पवार, दिलीप अहिरे व असंख्य दिव्यांग महिला व बांधव उपस्थित होते.

फोटो- ०५ प्रहार दिव्यांग

प्रहार संघटनेच्या वतीने अपंग दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी दत्ता आरोटे यासह तहसीलदार शरद घोरपडे व मान्यवर.

===Photopath===

051220\05nsk_19_05122020_13.jpg

===Caption===

प्रहार संघटनेच्या वतीने अपंग दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी दत्ता आरोटे यासह तहसीलदार शरद घोरपडे व मान्यवर. 

Web Title: Celebrate Disability Day on behalf of Prahar Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.