३२ किलोमीटर सायकलिंग करून डॉक्टर डे साजरा शिवतिर्थ : बागलाण सायकलिस्टचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:19+5:302021-07-02T04:11:19+5:30

शिवतिर्थ ते देवळा येथील परतीची ३२ किलोमीटरची सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व हे या निमित्ताने ...

Celebrate Doctor's Day by cycling 32 km Shivatirtha: An initiative of Baglan cyclists | ३२ किलोमीटर सायकलिंग करून डॉक्टर डे साजरा शिवतिर्थ : बागलाण सायकलिस्टचा उपक्रम

३२ किलोमीटर सायकलिंग करून डॉक्टर डे साजरा शिवतिर्थ : बागलाण सायकलिस्टचा उपक्रम

Next

शिवतिर्थ ते देवळा येथील परतीची ३२ किलोमीटरची सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व हे या निमित्ताने पटवून समाजामध्ये जागृती व्हावी म्हणून राईड फॉर ह्युमिनिटी अंतर्गत ही रॅली काढण्यात आली. जास्तीत जास्त लोकांनी सायकलिंगकडे वळावे, आरोग्याकडे लक्ष द्यावे, मनाबरोबर शरीराचे आणि शरीराबरोबर मनाचे सुद्धा स्वास्थ ठेवण्याचा प्रयत्न करावे, आणि व्यायामासाठी, फिटनेससाठी प्रोत्साहित करावे व सुदृढ समाज बनवण्यातकडे कल वाढवावा असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले.

या रॅलीत नितीन जाधव, डॉ. विशाल आहिरे पाटील, डॉ. किरण पवार, डॉ. अतुल जाधव, डॉ.संदीप ठाकरे, डॉ.पंकज शिवदे, डॉ.अमित सूर्यवंशी, डॉ.प्रताप देवरे, डॉ. महेंद्र कोठावदे, डॉ. संदेश निकम, डॉ.रवी सूर्यवंशी, डॉ. रवींद्र बागुल, डॉ.अभिजीत थोरात, डॉ.विश्वास देवरे, डॉ.सतीश अहिरे, डॉ.सागर शेवाळे,डॉ. स्वप्निल आहेर,डॉ.कपिल सोनवणे,अमोल पाटील,प्रशांत रौंदळ, उमेश बिरारी, विनोद शिरसाळे, मोहन सूर्यवंशी सर, संजय सोनवणे, सचिन सोनवणे,तेजस सोनवणे,राहुल सोनवणे, सुनील छाजेड, पंकज भांगडिया, दिपक सोनवणे, हेमंत भदाणे पाटील आदी सहभागी झाले होते.

ईन्फो

बागलाण तालुक्यातील पण नाशिकला स्थायिक झालेले बागलाण सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य अतुल भामरे, रोहिणी भामरे, डॉ.क्रांती आहिरे, रूपाली सोनवणे, उज्वल कोठावदे व पिंपळनेरला असलेले डॉ. सत्यजित सोनजे आणि डॉ. महेंद्र काळे यांनीही आपआपल्या परीसरात सायकल रॅली काढत बागलाण सायकलिस्ट असोसिएशनचा उत्साह द्विगुणित केला.

010721\01nsk_26_01072021_13.jpg

 सायकल रॅलीत सहभागी बागलाण सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य 

Web Title: Celebrate Doctor's Day by cycling 32 km Shivatirtha: An initiative of Baglan cyclists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.