नांदूरशिंगोटे परिसरात साध्या पद्धतीने ईद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:47+5:302021-05-16T04:13:47+5:30
------------------------- पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वाटप सिन्नर : क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या सिन्नर शाखेच्या वतीने सिन्नर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ...
-------------------------
पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वाटप
सिन्नर : क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या सिन्नर शाखेच्या वतीने सिन्नर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी एरिया मॅनेजर नरेश रेड्डी, शाखाधिकारी उद्धव बिलारी, शुभम तायडे आणि तुषार गायकवाड आदींच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, विनोद टिळे व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
-----------------
मजुरांवर उपासमारीची वेळ
नांदूरशिंगोटे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद झाल्याने, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न मजुरांना पडला आहे.
--------------------
खरीप हंगामावर संकट
नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या खरीप हंगामावर मागील वर्षीप्रमाणे संकट आहे. या चिंतेत शेतकरी सापडला आहे. सरकारला मात्र दुसऱ्या वर्षीही अनुदान, विमा, गारपिटीची भरपाई, कर्जमाफीचा विसर पडलेला दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.
----------------
बेरोजगारीमुळे युवा पिढीत नैराश्य
सिन्नर : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले हजारो तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे जे कामावर होते ते ही बेरोजगार झाले आहेत. तर अनेक जण नवीन कामाच्या शोधात आहेत. मात्र, बाजारपेठेत असणारी आर्थिक मंदी व लॉकडाऊन यामुळे अनेकांना अपयश येत असल्याने, तरुणांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.