सार्वजनिक ऐवजी घरोघरी गणेशोत्सव साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:47 PM2020-08-19T15:47:18+5:302020-08-19T15:49:02+5:30
सिन्नर: सद्या देशात तसेच राज्यात कोरोना संसर्गाचे संकट ओढावले असून या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता प्रत्येकाने आपल्या कुटूंबात, घरी गणेशाची स्थापना करुन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.
सिन्नर: सद्या देशात तसेच राज्यात कोरोना संसर्गाचे संकट ओढावले असून या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता प्रत्येकाने आपल्या कुटूंबात, घरी गणेशाची स्थापना करुन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.
सिन्नर पोलीस ठाण्याच्यावतीने चांडक कन्या विद्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत व्यासपिठावर अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपअधिक्षक माधव रेड्डी, तहसिलदार राहूल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार आदी उपस्थित होते.
गर्दी कमी केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. त्यामूळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सुचना महिनाभर आधीच जाहीर केल्या आहेत. गेल्या चार साडेचार महिण्यांपासून पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, नगर परिषद या सर्वच यंत्रणांवर ताण आला असून या उत्सवाच्या काळात हा ताण कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगर परिषदेने गणेश विसर्जनासाठी उपनगरांमध्ये कृत्रिम तळे तयार करावेत अशी सूचनाही वालावलकर यांनी केली.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, शहराध्यक्ष सोनल लहामगे, दत्ता वायचळे, डॉ. व्ही.एम. अत्रे, डॉ. विजय लोहरकर, भाऊसाहेब शिंदे, प्रा. आर.के. मुंगसे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी विविध सुचना केल्या. पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. -
गणेशाच्या आगमनाच्या वेळी व विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढता येणार नाही. कारण राज्यात अजूनही संचारबंदी लागू असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनीक गणेश मंडळांना परवानगी मिळणार नाही. मात्र, घरामध्ये गणेशाची स्थापना करण्यास कुठलीही अडचण नाही. सार्वजनिक गणेश मंडळांना नगर परिषदेची परवानगी घेणे बंधनकारक असून यापूर्वी असर्णाया नियमांबरोबरच यंदा मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरची व्यवस्था मंडळांना करावी लागेल असे बैठकीत स्पष्ट केले.