सिन्नरसह ग्रामीण भागात होळी सण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:32 AM2019-03-22T00:32:53+5:302019-03-22T00:33:14+5:30
सिन्नर : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरांसमोर व घरांसमोर होळी पेटवून तिचे मनोभावे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
सिन्नर : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरांसमोर व घरांसमोर होळी पेटवून तिचे मनोभावे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
काळाच्या ओघात बऱ्याच पारंपरिक प्रथांचा विसर पडत चालला असला तरी सिन्नर शहर व ग्रामीण भागात होळीच्या सणाचे महत्त्व टिकून आहे. तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथे पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करून गावची परंपरा जोपासण्याचे कार्य यावर्षी ही सुरू ठेवले. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते यामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते. राजा हिरण्यकश्यपु हा स्वत:ला देव समजत असे; पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. राजाने भक्त प्रल्हादला विष्णुभक्ती करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला; पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला; परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होलिका भस्म झाल्याचीही आख्यायिका सांगितली जाते. या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्याच विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला गेला. हीच परंपरा जोपासत निमगाव-सिन्नर येथील ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे रोकडेश्वराच्या मंदिरासमोर विधिवत पूजा करून होळी सण साजरा केला आणि परंपरेचे जतन केले.
खामखेड्यात होळीचा निरुत्साह
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे होळीचा सण दुष्काळामुळे निरु त्साहात साजरा करण्यात आला. होळीचा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या सणासाठी शेतमाल विकून हाती पैसा आलेला असतो. चालू वर्षी शेतकºयांच्या कोणत्याही मालाला भाव नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला.