मालेगावसह परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:09+5:302021-08-18T04:20:09+5:30
दौलती इंटरनॅशनल स्कूल मालेगाव : येथील दाैलती इंटरनॅशनल स्कूलमध्ये अध्यक्षस्थानी देविदास बच्छाव होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य ...
दौलती इंटरनॅशनल स्कूल
मालेगाव : येथील दाैलती इंटरनॅशनल स्कूलमध्ये अध्यक्षस्थानी देविदास बच्छाव होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अनन्या दैतकार, जानव्ही देवरे यांनी केले. आभार कमलेश खैरनार यांनी मानले. यावेळी कोषाध्यक्षा कमलताई बच्छाव, सचिव सचिन बच्छाव, उपाध्यक्षा पूनम बच्छाव, केतन सूर्यवंशी, आदि उपस्थित होते.
----
रावळगाव महाविद्यालय
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य अरुण येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाघ, उपप्राचार्य गौतम निकम, प्रा. जे. व्ही. मिसर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य येवले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. बी. के. अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल गरूड यांनी केले. आभार प्रा. ए. एन. पाचंगे यांनी मानले.
मराठी अध्यापक विद्यालय मालेगाव कॅम्प
मालेगाव : कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळा येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. सोनवणे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संचलन छात्र अध्यापिका सुजाता दळवी व प्रा. किरण पवार यांनी केले. छात्र अध्यापिका जया खेडकर, शिरीन पिंजारी, सुजाता दळवी यांनी समूह गीत सादर केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जया खेडकर व शिरीन पिंजारी यांनी केले. कार्यक्रमास डॉ. कविता पाटील, प्रा. किरण पवार, प्रा. पी. ई. पाटील, आर. आर. अहिरे, डी. एम. चौधरी, आदी उपस्थित होते.
एसपीएच विद्यालय
मालेगाव : येथील एस. पी. एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्या कल्पना देसले होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सी. एम. साळुंके यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या देसले, पर्यवेक्षक नितीन सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आर. एम. बाचकर, एस. बी. धोंडगे, एस. एस. कापडणीस, एम. एस. भदाणे, आदी उपस्थित होते.
टी. एम. हायस्कूल
मालेगाव : येथील नया इस्लामपुरा भागातील टी. एम. हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज येथे डॉ. आमिर सिराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रियान अब्दुल सत्तार व मोईन अख्तर उपस्थित होते. मुख्याध्यापक परवेज अन्सारी यांनी मनोगत व्यक्त केले.
र. वी. शाह विद्यालय
मालेगाव शहरातील र. वी. शाह विद्यालयात सुभाष शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष परेश शाह, सचिव प्रताप शाह, भालचंद्र पारीख, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विवेक कासार यांनी केले. मंदार जोशी व विद्यार्थिनींनी समूह गीत सादर केले. सुनंदा पाटील यांच्या हस्त पुस्तिकेचे प्रकाशन झाले.
जामेतुल हुदा हायस्कूल
मालेगाव : शहरातील जामेतुल हुदा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक रशिदी मो. युसुफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिक्षक शहीमुर्रहमान व अजीम फलाही यांची भाषणे झाली.
के. बी. एच. विद्यालय, मळगाव
मालेगाव : तालुक्यातील मळगाव नागुजीचे येथील के. बी. एच. विद्यालयात मुख्याध्यापक एस. बी. देवरे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी निबंध स्पर्धा घेण्यात आली. सूत्रसंचालन एस. व्ही. देवरे यांनी केले. आभार आर. जे. अहिरे यांनी मानले.
----
औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय
मालेगाव : शहरातील जाजूवाडी येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना काळात दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन समाधान सूर्यवंशी यांनी केले. प्राचार्य व्ही. ए. बैरागी व शिक्षक उपस्थित होते.
राजीव गांधी स्कूल, दाभाडी
मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शाहीद शेख, कमलाकर पवार, वैशाली पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन कविता महाजन यांनी केले. आभार मंगेश अहिरे यांनी मानले.
रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन
वडनेर : मालेगाव कॅम्पातील रोटरी कल्याण गार्डन येथे रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ मालेगाव लूम सिटी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
के. बी. एच. विद्यालय टाकळी
मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील के. बी. एच. विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. पी. शिंदे हाेते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन डी. एस. सावंत यांनी केले. प्रास्ताविक पी. डी. मांडवडे यांनी केले. आभार एस. डी. अमृतकर यांनी मानले.
काकाणी विद्यालय
मालेगाव : शहरातील काकाणी विद्यालयांमध्ये संस्थेचे सेक्रेटरी सतीश कलंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्ष विलास पुरोहित यांनी सरस्वती पूजन केले. तुकाराम मांडवडे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
भामेश्वर विद्यालय तळवाडे
मालेगाव : तालुक्यातील तळवाडे येथील महंत भामेश्वर जनता विद्यालयात मविप्र अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट गाईड ध्वजारोहण सुभाष पवार यांनी केले. मुख्याध्यापक खैरनार यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व्ही. पी. संसारे यांनी केले. आभार पी. टी. पाकळे यांनी मानले.