चांदवड महाविद्यालयात ग्रंंथालय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 04:36 PM2018-08-14T16:36:33+5:302018-08-14T16:39:36+5:30
चांदवड - लोकमान्य टिळक म्हणायचे की, जिथं पुस्तकं आहे तिथं स्वर्ग असतो . त्यामुळे देवालयाप्रमाणे आपण ग्रंथालय वंदनीय म्हणून जवळ केली पाहिजे, तरच आपला बौध्दीक विकास होऊ शकतो. असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले.राष्टÑीय ग्रंथपाल दिनानिमित्त चांदवड महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त ते बोलत होते.
चांदवड - लोकमान्य टिळक म्हणायचे की, जिथं पुस्तकं आहे तिथं स्वर्ग असतो . त्यामुळे देवालयाप्रमाणे आपण ग्रंथालय वंदनीय म्हणून जवळ केली पाहिजे, तरच आपला बौध्दीक विकास होऊ शकतो. असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले.राष्टÑीयग्रंथ ग्रंथपाल दिनानिमित्त चांदवड महाविद्यालयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दत्ता शिंपी होते. प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. संतोष ठाकरे यांनी केले. तर डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा जीवनपट प्रा.मधुकर झांजे यांनी विशेद केला. आपल्या व्याख्यानात डॉ. पाटील यांनी सांगीतले की, जी. ओढ घराची असते, ती ग्रंथालयाची असावी , ग्रामीण भागात ग्रंथ वृत्तपत्र फारसे मिळत नाहीत. तर महाविद्यालयांचा उपयोग आधिकाधिक प्रमाणात करावा, अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी मोबाईल व्हाटअप यात न गुंतून पडता ग्रंथामध्ये गुंतून पडा, तेच तुमचे जीवन सुंदर करतील ग्रंंथापासून दुर जाणे म्हणजे व्यक्तीमत्वाचा ºहास करणे होय असे त्यांनी सांगीतले. सूत्रसंचालन डॉ. तुषार चांदवडकर यांनी केले. आभार श्रीमती सुरेखा मोरे, यांनी केले. कार्यक्रमास विठ्ठल भोई, सुनील महाले, बिपीनचंद्र पानपाटील, रेखा खैरनार , उपप्राचार्य डॉ. संजय खैरनार,प्रा. आर.जे.इंगोले, प्रा. एस.व्ही. सोनवणे प्रा. किशोर अहिरे, प्रा. रवींद्र वाघ तसेच विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.