स्थानिक स्वराज्य संस्था दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:32 AM2021-09-02T04:32:12+5:302021-09-02T04:32:12+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक शहर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ...
कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक शहर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संस्थेचे संस्थापक सी. डी. बर्फीवाला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून संस्थेतील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा आणि स्वच्छतेबद्दलचे घोषवाक्य या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसआय कोर्सचा विद्यार्थी चेतन देवरे याने प्रथम क्रमांक पटकावला. अखिल भारतीय स्थानिक संस्थेची स्थापना १९२६मध्ये मुंबई येथे झाली. देशभरात संस्थेची एकूण ३५ प्रादेशिक केंद्र असून, संस्थेची विशेष प्रशिक्षण संस्था केंद्र शासनाच्या अंतर्गत नागरी विकास मंत्रालयाच्या पश्चिम भारत विभागाशी संलग्न आहे. ज्ञान व कौशल्य प्रशिक्षणाद्वारे संस्था नेहमीच आघाडीवर आहे. या संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता निरीक्षक या मान्यताप्राप्त कोर्सला आत्ताच्या काळात खूप मागणी आहे. या कोर्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे, ही संस्थेसाठी महत्त्वाची बाब असल्याचे संस्थेचे विभागीय संचालक जीवनकुमार सोनवणे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो- ०१ जीवनकुमार सोनवणे
010921\01nsk_32_01092021_13.jpg
फोटो- ०१ जीवनकुमार सोनवणे