‘हेरिटेज वॉक’द्वारे संग्रहालय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:14 AM2019-05-22T00:14:37+5:302019-05-22T00:14:53+5:30
जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त शुक्रवारी (दि.१८) हेरिटेज वॉकच्या माध्यमातून संग्रहालय दिन साजरा करण्यात आला.
नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त शुक्रवारी (दि.१८) हेरिटेज वॉकच्या माध्यमातून संग्रहालय दिन साजरा करण्यात आला.
या हेरिटेज वॉकमध्ये नाशिकमधील शिक्षण साहित्य व कलाप्रेमींनी प्रतिसाद देत शैक्षणिक वारसा संग्रहालयाला काही ऐतिहासिक वस्तूंची भेटही दिली. यात नाणे संग्राहक चेतन राजापूरकर यांनी मविप्र शैक्षणिक वारसा संग्रहालयास ७व्या, १४व्या व १५व्या शतकातील पेशवेकालीन नाणी तसेच निसर्गाशी निगडित आदिवासी देवतांच्या मूर्ती सुपूर्द केल्या.
यावेळी शिल्पकार अनंत खैरनार, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एस. के. शिंदे, डॉ. एन. एस. पाटील, कल्पना कुशारे आदी उपस्थित होते. यावेळी नीलिमा पवार यांनी शैक्षणिक वारसा संग्रहालयाच्या उभारणीपासूनच्या वाटचालीविषयी माहिती दिली. तसेच संग्रहालयासाठी नागरिकांनी आपल्याकडील शैक्षणिक दस्तऐवज, कलाकृती, शिल्प दान करण्याचे यावेळी आवाहन केले.