सुकन्या समृद्धीचे खाते उघडून अनोख्या पद्धतीने ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:51+5:302021-09-27T04:15:51+5:30

सिन्नर : भारतीय डाक विभागाने दहा वर्षांच्या आतील मुलींचे खाते रविवारी सुट्टीच्या (दि.२६) दिवशी राष्ट्रीय कन्या दिवसाचे निमित्त ...

Celebrate 'National Girls' Day' in a unique way by opening an account of Sukanya Samrudhi | सुकन्या समृद्धीचे खाते उघडून अनोख्या पद्धतीने ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ साजरा

सुकन्या समृद्धीचे खाते उघडून अनोख्या पद्धतीने ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ साजरा

Next

सिन्नर : भारतीय डाक विभागाने दहा वर्षांच्या आतील मुलींचे खाते रविवारी सुट्टीच्या (दि.२६) दिवशी राष्ट्रीय कन्या दिवसाचे निमित्त साधत सुरू करून अनोख्या पद्धतीने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमास नाशिक विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली.

रविवारी सुट्टीच्या दिवशी राष्ट्रीय कन्या दिवस आला. तथापि, प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव, पश्चिम उपविभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत नाशिक विभागात अनेक ठिकाणी रविवारी मेळावे घेत दहा वर्षांच्या आतील मुलींचे समृद्धी सुकन्याचे खाते सुरू करण्यात आले.

भारतीय डाक विभागामार्फत निफाड तालुक्यातील चाटोरी येथे राष्ट्रीय कन्या दिवस साजरा करण्यात आला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची माहिती आणि नवीन खाते उघडण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले. याप्रसंगी नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी मुलींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि गावातील पालकांना सुकन्या समृद्धी योजनेची माहिती दिली.

यावेळी दहा सुकन्या समृद्धी योजनेचे नवीन खाते उघडण्याचे फॉर्म पात्र मुलींच्या पालकांकडून भरून घेण्यात आले. अहिरराव यांनी ही योजना २०१५ मध्ये सुरू झालेली आहे परंतु तिचा म्हणावा इतका प्रचार प्रसार ग्रामीण भागामध्ये झालेला दिसत नाही, त्या अनुषंगाने भारतीय टपाल विभागामार्फत ही योजना सर्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक विभागाने संपूर्ण जिल्ह्यातील दहा वर्षांच्या आतील पात्र मुलींना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने मोलाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.

यावेळी चाटोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका गणेश हांडगे, उपसरपंच भाऊसाहेब लक्ष्मण घोलप, माजी सरपंच किरण घोंगडे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून टपाल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

या कार्यक्रमावेळी विभागीय कार्यालयातील किरण वरपे यांनी टपाल विभागाच्या संपूर्ण योजनांची माहिती नागरिकांना दिली. ब्रँच पोस्ट मास्तर दीपाली पवार यांनी संपूर्ण योजना गावातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पोटे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक विभागातील कर्मचारी घनश्याम देशपांडे, ज्ञानेश्वर गोरे, अमोल शिंदे, अरुण दुसाने, सोपान खालकर, गणेश यंदे यांचे सहकार्य लाभले.

चौकट...

जिल्हाभर उत्स्फूर्त प्रतिसाद

डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या या उपक्रमास नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पश्चिम उपविभागात सुमारे ५० मुलींचे सुकन्या समृद्धीसाठी अर्ज भरून घेण्यात आले. दिवसेंदिवस प्रसार वाढत चालल्याने केंद्र सरकारच्या या योजनेला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव, उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

(२६ चाटोरी)

चाटोरी येथे राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त सुकन्या समृद्धी योजनेचा मेळाव्याप्रसंगी मोहन अहिरराव, किरण वरपे, दीपाली पवार, विठ्ठल पोटे, घनश्याम देशपांडे, ज्ञानेश्वर गोरे, अमोल शिंदे, अरुण दुसाने, सोपान खालकर, गणेश यंदे आदी उपस्थित होते.

260921\26nsk_29_26092021_13.jpg

निफाड तालुक्यातील चाटोरी येथे राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त सुकन्या समृद्धी योजनेचा मेळावा प्रसंगी मोहन अहिरराव, किरण वरपे, दीपाली पवार, विठ्ठल पोटे, घनश्याम देशपांडे, ज्ञानेश्र्वर गोरे, अमोल शिंदे,अरुण दुसाने, सोपान खालकर, गणेश यंदे आदी.

Web Title: Celebrate 'National Girls' Day' in a unique way by opening an account of Sukanya Samrudhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.