विविध शाळांमध्ये ओझोन दिन साजरा

By Admin | Published: September 26, 2015 10:26 PM2015-09-26T22:26:16+5:302015-09-26T22:27:09+5:30

विविध शाळांमध्ये ओझोन दिन साजरा

Celebrate ozone day in different schools | विविध शाळांमध्ये ओझोन दिन साजरा

विविध शाळांमध्ये ओझोन दिन साजरा

googlenewsNext

नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये ओझोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त तुळशीच्या रोपांचे वाटप, वृक्षदिंडी आदि कार्यक्रम घेण्यात आले.
नूतन मराठी शाळा
नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत ओझोन दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी क्रेडाईचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त बाळासाहेब गामणे, संचालक नाना दरगोडे, शरद बोडके, संपत वाघ, भगवान सानप, कचरू आव्हाड, प्रकाश घुगे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पक्षीमित्र अनिल माळी, विजय गोळसर, सामाजिक वनीकरणाचे सानप, पाटोळे यांनी केले. तुळस लावताना काढलेला सेल्फी पाठवा, तसेच तुळस लावा ओझोन वाचवा यावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. सूत्रसंचालन श्रीमती सीमा ताडगे यांनी केले.
पेठे विद्यालय
नाएसो संचलित रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात ओझोन दिनानिमित्त तुलसी महोत्सव संपन्न झाला. याप्रसंगी नारायण पाटोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक गीता कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, प्रियंका निकम, कुंदा जोशी, कैलास पाटील, शैलेश पाटोळे, विजय पाटोळे आदि उपस्थित होते.
मखमलाबाद महाविद्यालय
म.वि.प्र. समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय, मखमलाबाद भूगोल विभागाच्या वतीने ओझोन दिन साजरा झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य बी. आर. तांबे, मराठी विभागप्रमुख प्रा. डी. बी. वेलजाळी व भूगोल विभागाचे प्रा. पी. पी. शार्दुल होते. याप्रसंगी प्रा. वेलजाळी यांनी ओझोन थराचे महत्त्व, पर्यावरणात बदल याची माहिती दिली. यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाची शपथ दिली व विद्यार्थ्यांनी यावेळी एक वृक्ष दत्तक घ्यावा व त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा. शार्दुल यांनी केले. यावेळी प्रा. जी. आर. पिंगळे, प्रा. एस. एस. गायकवाड, प्रा. व्ही. एस. राजोळे, प्रा. श्रीमती एन. बी. पाटील, प्रा. एस. एस. केंदळे, प्रा. आर. बी. तांबे, प्रा. टी. जी. देवरे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र हायस्कूल
भा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूल उपनगर या शाळेत जागतिक ओझोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी एस. बी. वैद्य होते. यावेळी व्यासपीठावर पक्षिमित्र अनिल माळी, एन. बी. पाटोळे, मुख्याध्यापक दत्ता गोसावी, डॉ. सुप्रिया पाटोळे, सामाजिक वनीकरण विभागाचे सानप आदि उपस्थित होते. ‘तुळस लावा, ओझोन वाचवा’ अशी शपथ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली. प्रास्ताविक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.

Web Title: Celebrate ozone day in different schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.