पथ विक्रेता दिन म्हणून साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:54+5:302021-01-21T04:14:54+5:30
सामान्य जनतेला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सेवा व वस्तूंची आवश्यकता भासत असते. पथविक्रेत्यांना जशी आपली गरज आहे ...
सामान्य जनतेला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सेवा व वस्तूंची आवश्यकता भासत असते. पथविक्रेत्यांना जशी आपली गरज आहे तशीच राज्यातील जनतेला देखील पथविक्रेत्यांची गरज आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात देखील या पथविक्रेत्यांनी आपल्या सेवा अखंडित चालू ठेवल्या.समाजातील हा असंघटित घटक नेहमीच दुर्लक्षित असल्या कारणाने त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणूनच ज्या दिवशी पथविक्रेत्यांसाठी आपल्या देशात स्वतंत्र कायदेशीर धोरण लागू झाले तो दिवस म्हणजे २० जानेवारी २००४ हा दिवस होय. त्यामुळे दरवर्षी २० जानेवारी हा ''पथविक्रेता दिन'' म्हणून घोषित करावा.तसेच कोरोना काळामध्ये आपली सेवा अखंडित चालू ठेवणाऱ्या पथविक्रेत्यांना कोरोना योध्दा म्हणून घोषित करावे अशी मागणी युनियनचे अध्यक्ष सुधाकर जोशी ,सरचिटणीस दिनेश ठाकरे, असिफ तांबोळी,राजेंद्र पाटील,मनोज बोरवाल, विकी पाटील,शाम करपे,राजेंद्र ललन,रवींद्र देवरे,सूर्यकांत बनसोडे,राहुल उपाडे,मंगेश बावसकर,मयूर परदेशी,कलंदर शेख,सैफु रहमान आदींनी केली आहे