लासलगावी भोंडला सण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 06:56 PM2018-10-14T18:56:13+5:302018-10-14T18:56:37+5:30
भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात प्रचिलत असणारा स्त्रीयांचा उत्सव व सामुदायिक खेळाचा प्रकार जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी आनंदाने खेळला.
लासलगाव -भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात प्रचिलत असणारा स्त्रीयांचा उत्सव व सामुदायिक खेळाचा प्रकार जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी आनंदाने खेळला.अ श्विन मिहन्यात हस्त नक्षत्राला सुरूवात होऊन पौर्णिमेपर्यंत भोंडला किंवा हादगा खेळला जातो.नवरात्रीच्या नऊ दिवसांत हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवून त्याभोवती फेर धरला जातो .पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो . विद्यालयाच्या मैदानावर हत्तीची प्रतिमा ठेवून पूजन केले तसेच कै.दत्ताजी पाटील व सरस्वती मातेचे पूजन आण िदिपप्रज्वलन करु न उत्सवाला सुरु वात केली .विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा करु न ऐलमा पैलमा गणेश देवा या गाण्याने भोंडल्याची सुरूवात करु न फेर धरला .भोंडल्याची विविध गाणी गायल्याने वातावरण प्रसन्न झाले .खिरापतीचा प्रसाद देण्यात आला.याप्रसंगी रंजनाताई पाटील , संचालिका निताताई पाटील , सुवर्णाताई जगताप ,शर्मा भाभी, सुचित्रा व्यास, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांनी कार्यक्र माचा आनंद द्विगुणति केल.तसेच संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील , निवृत्ती गायकर, संजय पाटील , लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या प्राचार्या अनिता अिहरे ,पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी आदी उपस्थित होते.( 14 लासलगाव भोंडला)