जेएटी महिला महाविद्यालयात सायन्स फिक्शन डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:12 AM2021-01-04T04:12:08+5:302021-01-04T04:12:08+5:30
विज्ञान कथा कादंबरी हा एक विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य प्रकार आहे. शंभर वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेल्या या साहित्य ...
विज्ञान कथा कादंबरी हा एक विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य प्रकार आहे. शंभर वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेल्या या साहित्य प्रकारातून विज्ञान विचारांचा प्रसार होत असतो. या विज्ञान कथा-कादंबऱ्या भविष्यात आपले काय होईल, याचा कल्पना विस्तार करीत असतात. भविष्याचा वेध घेणाऱ्या या विज्ञान कथा-कादंबऱ्यांमध्ये भविष्यातील काल्पनिक जग हे माणसांचेच असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेपण करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो आणि त्या काळातील समाज कसा असेल, मानवी परस्पर संबंध कसे असतील, याचे चित्रण केले जाते. विज्ञान साहित्य अधिक आवडीने वाचले जावे आणि या प्रकाराची ओळख विद्यार्थिनींना व्हावी, यासाठी जेएटी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे सायन्स फिक्शन डे साजरा करण्यात आला. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.सुनेत्रा मेश्रामकर यांनी सायन्स फिक्शन या साहित्य प्रकाराबद्दल विद्यार्थिनींना माहिती दिली. प्रा.मुनव्वर अहमद यांनी प्रास्ताविक केले. फरहा नाझ या विद्यार्थिनीने आभार मानले. यावेळी कार्यक्रमाला डॉ.सलमा अब्दुल सत्तार, डॉ.अन्सारी फहमिदा, डॉ.लोधी कनिझ फातिमा, प्रा.सुनिता देसले यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
===Photopath===
030121\03nsk_1_03012021_13.jpg
===Caption===
जेएटी महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. मोहंमद हारुण अन्सारी. समवेत प्रा. सुनेत्रा मेश्रामकर, डॉ. कनिझ फातिमा लोधी, प्रा. सुनिता देसले, डॉ. सलमा अब्दूल सत्तार आदि.