‘स्वयंसिद्धा’ पुरस्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:14 AM2020-03-16T00:14:01+5:302020-03-16T00:14:37+5:30
रोटरी नाशिक एन्क्लेव्ह व रामकृष्ण पब्लिकेशन्सच्या ग्राहकदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या रतनलाल सी. बाफना स्वयंसिद्धा महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रोटरी हॉल, गंजमाळ येथे करण्यात आले होते.
नाशिक : रोटरी नाशिक एन्क्लेव्ह व रामकृष्ण पब्लिकेशन्सच्या ग्राहकदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या रतनलाल सी. बाफना स्वयंसिद्धा महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रोटरी हॉल, गंजमाळ येथे करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर नाशिक पोलीस निर्भया पथकच्या प्रमुख नम्रता देसाई, रमेश मेहेर, रोटरी नाशिक एन्क्लेव्ह प्रेसिडेंट गुरमित सिंग ग्रोवर, आशा वेणुगोपाल, रामकृष्ण पब्लिकेशन्सचे संस्थापक मनीष पात्रीकर, अशोक जैन, प्रेम मेहंदीचे संघपाल तायडे उपस्थितीत होते. यावेळी नम्रता देसाई म्हणाल्या की, महिलांना ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या सगळ्या क्षेत्रांत आपले वेगळेपण सिद्ध करून दिले आहे. प्रत्येक युवकाने धडाडीने पुढे येणाºया युवतींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर आमच्यासारख्या निर्भया पथकाची गरज पडणार नाही. या पुरस्काराकरिता वैशाली प्रधान, ममता कुलकर्णी, अंजना गुप्ता, साधना क्षत्रीय, डॉ. स्नेहल गांगुर्डे, राहुल बाफना, राकेश गेहलोत यांचे सहकार्य लाभले आहे. सूत्रसंचालन मंजूषा विसपुते यांनी केले. कार्यक्र मास मनीष दुधाडे, डॉ. श्रेया कुळकर्णी, ममता कुलकर्णी, अंजना गुप्ता, मंजूषा पात्रीकर आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाºया अबान इरानी, हेमा पटवर्धन, सुनीता सिरसाठ, निमी करी, स्मिता देशमुख, विद्या फडके, पूजा लाहोटी, संगीता करकरे, स्मिता कापडनीस, देविका भागवत, तसेच निर्भया पथकातील सर्व सदस्य यांना स्वयंसिद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले.