शब-ए-बारात शांततेत साजरी करा अजय मोरे : मालेगावी शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:13 AM2018-04-27T00:13:05+5:302018-04-27T00:13:05+5:30
आझादनगर : आगामी शब-ए-बरात दरम्यान सर्व विभागाकडून आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शब-ए-बरात शांततेत साजरी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले.
आझादनगर : आगामी शब-ए-बरात दरम्यान सर्व विभागाकडून आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शब-ए-बरात शांततेत साजरी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले. शब-ए-बरातनिमित्ताने बडा कब्रस्तान येथे बुधवारी रात्री घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, विश्वस्त अॅड. नियाज लोधी, हरिष मारू उपस्थित होते. प्रांत मोरे पुढे म्हणाले की, मागील काही वर्षाचा अनुभव पाहता व नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पालन करीत सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले. नागरिकांच्या सुरक्षेस्तव प्रशासनास प्रसंगी कठोर भूमिकाही घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सण शांततेत साजरा करावा. अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, शब-ए-बरात निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्या भिकाºयांची संख्या लक्षात घेता त्यांना मनमाड रेल्वेस्थानकावरच थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
शहरातील पाचही कब्रस्थान व परिसरात गत वर्षाच्या तुलनेत दुप्पट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. कब्रस्तानाच्या प्रवेशद्वारालगतचे व रस्त्यावरील अतिक्रमण येत्या एक-दोन दिवसात मनपाकडून काढण्यात येणार आहे. मागील काही घडलेल्या घटनांमुळे व माझ्या सेवा कार्यकाळात प्रथमच शब-ए-बरात येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रीय करण्यात आले आहे. यावेळी बंदोबस्ताबाबत व इतर सुविधांबाबत पोद्दार यांनी माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक गजानन राजमाने, कब्रस्तानचे विश्वस्त अॅड. नियाज अहमद लोधी, पोलीस निरीक्षक मसुद खान, रियाज अन्सारी, शांतता समिती सदस्य गुलाब पहेलवान आदिंचे भाषणे झाली. या बैठकीस मौलाना जमाली, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी नागरिक उपस्थित होते.