शब - ए - बारात शासन निर्देशांचे पालन करून साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:39+5:302021-03-19T04:13:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : शहरात काेराेना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शब-ए-बारातचा ...

Celebrate Shab-e-Barat by following the government instructions | शब - ए - बारात शासन निर्देशांचे पालन करून साजरी करा

शब - ए - बारात शासन निर्देशांचे पालन करून साजरी करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव : शहरात काेराेना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शब-ए-बारातचा सण शासनाने घालून दिलेल्या नियम व निर्देशांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन शहर विभागाच्या पाेलीस उपअधीक्षक लता दाेंदे यांनी केले.

मुस्लिम बांधवांचा येत्या २९ मार्चला शब-ए-बारात हा सण साजरा हाेत आहे. या पार्श्वभूमीवर येथील पोलीस नियंत्रण कक्षात कब्रस्तान ट्रस्टी, धर्मगुरु व विविध संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी उपअधीक्षक दाेंदे यांनी शासनाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे मशिदीत एकावेळी ५० व्यक्तिंनी नमाज पठण करावे, गर्दी न करता मास्क वापरुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकांचे आयाेजन करु नये, मशीद व परिसराचे निर्जंतुकीकरण करत स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, शक्यताे घरातच दुवा पठण करावे, या नियमांची माहिती दिली. ॲड. नियाज लाेधी यांनी शासन नियमांचे पालन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, ५० लाेकांच्या उपस्थितीची मर्यादा पालन हाेणे कठीण असून, यावर ताेडगा काढण्याची गरज व्यक्त केली. मुस्लिम बांधव आपल्या पूर्वजांच्या कबरींवर जाऊन दुवा पठण करतात. त्यामुळे कब्रस्तानचे गेट बंद ठेवू नये, अशी मागणी मालिक बकरा यांनी केली.

-----------------------

कब्रस्तानच्या रस्ता दुरूस्तीची मागणी

युसूफ इलियास यांनीही मनाेगत व्यक्त केले. रात्रभर मशिदींमध्ये नमाज व दुवापठण हाेते. टप्प्याटप्प्याने नागरिकांनी मशिदीत जावून आपले धार्मिक विधी उरकावे. कब्रस्तानमध्ये गर्दी करु नये, आदी सूचना करण्यात आल्या. दरम्यान, पूर्वजांच्या कबरींची रंगरंगाेटी करुन दुवापठण करण्याची परंपरा आहे. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांची कब्रस्तानमध्ये गर्दी हाेत असते. महापालिकेने शहरातील सर्व कब्रस्तानांची स्वच्छता करावी, पाणी, विजेची पूर्तता करावी. कब्रस्तान मार्गाच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

------------

मालेगाव येथे शब - ए - बारातच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी मार्गदर्शन केले. (१८ मालेगाव १)

===Photopath===

180321\18nsk_3_18032021_13.jpg

===Caption===

१८ मालेगाव १

Web Title: Celebrate Shab-e-Barat by following the government instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.