सण म्हणून शिवजयंती साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:03 PM2020-02-17T23:03:25+5:302020-02-18T00:21:35+5:30
शिवजयंती सण म्हणून साजरी करण्याचे आवाहन करीत आईवडिलांची सेवा केली तर प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते तथा शिवनिश्चल सेवाभावी संस्थेचे व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले.
नांदूरवैद्य : शिवजयंती सण म्हणून साजरी करण्याचे आवाहन करीत आईवडिलांची सेवा केली तर प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते तथा शिवनिश्चल सेवाभावी संस्थेचे व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे शिवजन्मोत्सवानिमित्त संगीतमय शिवचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन कार्याला उजाळा देत असताना गोसावी यांनी शिवाजी महाराजांच्या मोहिमा, तसेच त्यांच्या कार्याविषयीची माहिती मांडली. आजची तरुण पिढी वेगळ्याच मार्गाने जात असून, व्यसनाधीन झाली आहे. आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे यारून त्याचे पुढील भविष्य ठरत असते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे देशहितासाठी लढले. महापुरुषांचे आचार-विचार आचरणात आणून जीवन जगणे काळाची गरज बनल्याचे सांगत तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. यानंतर नाशिकजवळील साल्हेर किल्ल्याच्या इतिहासाविषयी माहिती दिली. अफजल खान वध, शाइस्तेखानावर हल्ला, नरवीर तानाजीच्या कार्याची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे इतिहासात अजरामर झालेल्या रायगडावरील हिरकणीचा इतिहास पटवून सांगताना आजच्या मुलींनी मॉँसाहेब जिजाऊंचा आदर्श घ्यावा, असेही सांगितले. यानंतर कार्यक्रम समारोपप्रसंगी गावातील तरुण युवकांच्या हस्ते शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांना शिवप्रतिमा भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शिवाजी महाराज यांच्या आरतीने कार्यक्र माची सांगता करण्यात आली.