विश्रामगडावर शिवपदस्पर्श दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 04:49 PM2018-11-22T16:49:34+5:302018-11-22T16:52:23+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने विश्रामगडावर शिवाजी महाराजांनी या गडावर २२ नोव्होंबर १६७९ रोजी भेट देऊन गडावर सतरा दिवस मुक्काम केल्याने आज या घडनेला ३३९ वर्ष पुर्ण होत असून विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने शिवपदस्पर्श दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Celebrate Swadhadas day in Varanagad | विश्रामगडावर शिवपदस्पर्श दिन साजरा

विश्रामगडावरील अंबारखान्याजवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करतांना नामदेव शिंदे, रामदास भोर, बबन काकड, शेखर कर्डीले, संदीप भोर, प्रदीप भोर, सचिन रायजादे, विजय शिंदे ,जयराम शिंदे , आदीनाथ शिंदे यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देझांज पथकाने सर्वत्र कौतुक

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने विश्रामगडावर शिवाजी महाराजांनी या गडावर २२ नोव्होंबर १६७९ रोजी भेट देऊन गडावर सतरा दिवस मुक्काम केल्याने आज या घडनेला ३३९ वर्ष पुर्ण होत असून विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने शिवपदस्पर्श दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवपदस्पर्श दिना निमित्ताने ठाणगाव येथून सकाळी सजवलेल्या रथामधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. रथाचे पुजन विश्रामगड मंडळाचे अध्यक्ष नामदेव शिंदे सामाजिक कार्यकर्ते ए. टी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विश्रामगडावर जाऊन गड देवता आंबा निंबा व पट्टाई देवीचे पुजन करण्यात आले व अंबारखान्याजवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व त्यानंतर आरती करण्यात आली. गडावर अकोले, अहमदनगर, नाशिक, धुळे, मुंबई, पुणे येथील हजारो शिव भक्तानी हजेरी लावून गडावर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणानी गड दुमदुमून निघाला होता. शिव भक्तानी संपूर्ण विश्रामगडाला प्रदक्षिणा केली.
शिवपदस्पर्श दिनानिमित्ताने ठाणगावी (२१) रोजी रात्री शिवचिरत्रकार तानाजी बोºहाडे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी विश्रामगड विकास मंडळाचे अध्यक्ष नामदेव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ए. टी. शिंदे, रामदास भोर, जयराम शिंदे, बबन काकड, आदीनाथ शिंदे, गणेश शिंदे, सतिश भोर, शेखर कर्डीले, विजय शिंदे, रु पेश शिंदे, वैभव शिंदे यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झांज पथकाने सर्वत्र कौतुक
ठाणगाव येथील पुंजाजी रामाजी भोर विद्यालय व डॉ. आण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील झांजपथक या मिरवणूकीत आग्रभागी होते. यावेळी झांजपथकाचे प्रमुख पी. बी. थोरात, सचिन ठुबे व प्राचार्य व्ही. एस. कवडे हे उपस्थित होते.
 

Web Title: Celebrate Swadhadas day in Varanagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक