विद्यालयात वृक्षलागवडीने नववर्ष केले साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 10:10 PM2019-04-06T22:10:41+5:302019-04-06T22:13:37+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले मराठी नववर्षाचे पर्यावरणाची गुढी उभारून स्वागत. यावेळी विद्यार्थ्यांनी नववर्षात जास्तीत जास्त फळाफुलांची झाडे लावण्याचा संकल्प केला.
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले मराठी नववर्षाचे पर्यावरणाची गुढी उभारून स्वागत. यावेळी विद्यार्थ्यांनी नववर्षात जास्तीत जास्त फळाफुलांची झाडे लावण्याचा संकल्प केला.
झाडे लावू गोड फळे खाऊ, झाडे आहेत हिरवीगार सावली देतात थंडगार, झाडे लावूया प्रदूषण टाळूया, गुढी उभारू ज्ञानाची भरारी घेऊ गुणवत्तेची, गुढी उभारू वृक्षांची काळजी घेऊ निसर्गाची, वृक्ष लावूया आनंदी राहूया, वृक्ष वाढवू घनदाट फार पाऊस पडेल जोरदार अशा विविध पर्यावरणपूरक घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रत्येक विद्यार्थी किमान १० झाडे लावून त्याची जोपासना करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करण्याचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले. मुख्याध्यापक एस.बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपला वाढदिवस साजरा करताना किमान दरवर्षी एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे. म्हणजेच सृजनशीलता जोपासून निसर्ग समतोल साधण्याचा प्रयत्न होईल, असे प्रतिपादन मुख्याध्यापक देशमुख यांनी केले. या उपक्रमात आर.व्ही. निकम, आर.टी. गिरी, बी.आर. चव्हाण, एस.एम. कोटकर, एम.सी. शिंगोटे, एम.एम. शेख, सविता देशमुख, टी.के. रेवगडे, सी.बी. शिंदे, के.डी. गांगुर्डे, एस.डी. पाटोळे, आर.एस. ढोली, के.पी. साठे, ए.बी. थोरे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.ठाणगावी कार्यक्रमठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक गुढी उभारून पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मारुती मंदिराला ग्रामस्थांच्या वतीने भगव्या झेंड्याची गुढी उभारण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते ए.टी. शिंदे यांच्या हस्ते गुढीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने साखर वाटप करून एकमेकांना नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रामदास भोर, दत्तू आंबेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.