ज्यूनिअर महाविद्यालयात सारी डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:52 PM2019-01-02T17:52:45+5:302019-01-02T18:08:05+5:30
येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सारी डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सारी डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्र माच्यो अध्यक्षस्थानी सुदाम गाडेकर होते. यावेळी मंचावर विद्यालयाचे प्राचार्य सुरेश आहिरे, उपप्राचार्य डी. डी. पैठणकर, पर्यवेक्षक मंगेश नागपुरे, अनिल साळुंके आदि उपस्थित होते.
भारतीय परंपरा व संस्कृती जोपासणाऱ्या सारी डे निमित्ताने विद्यालयातील सर्वच मुलींनी विविध प्रकारच्या साड्या परिधान करून सहभाग नोंदविला. यामध्ये प्रामुख्याने तेजश्री बोढारे, सरला राठोड, योगिता चव्हाण, आकांक्षा पैठणकर, कावेरी कोल्हे, मयुरी मोरे, दीपाली पालवे, शेख आसरीन यांनी मनोगतामधून कॉपी मुक्त परीक्षा, वृक्षारोपण व संवर्धन, परिसर स्वच्छता तसेच मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा संकल्प केला. विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्व, कॉफी मुक्त परीक्षा, चारित्र्याची जोपासना व सासू सासºयांना आई वडीलांप्रमाणे वागवणे म्हणजे वृध्दाश्रमाची गरज भासणार नाही असे उपयुक्त मार्गदर्शन विद्यालयातील महिला शिक्षिका सविता सौंदाणे यांनी केले. तसेच नंदा सोनवणे व रजनी जुजगर यांनीही उत्सवात सहभागी होऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रा संजीव कदम, प्रा. रमेश रोकडे, प्रा. संतोष दाभाडे, प्रा. जगदीश सूर्यवंशी, प्रा. अजय पाटील, प्रा. सचिन बच्छाव, प्रा. ज्ञानेश्वर बोडके, प्रा. विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रा. बी. एस. पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा. एस. एल. ठोंबरे यांनी आभार मानले.