मैत्रिणीचा रात्री वाढदिवस केला साजरा अन् सकाळी घेतला गळफास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 02:03 AM2022-06-16T02:03:23+5:302022-06-16T02:04:40+5:30

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील निवासी परिचारिकांच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या एका प्रशिक्षणार्थी युवा परिचारिकेने आपल्या खोलीत गळफास घेत आत्महत्या ...

Celebrated my friend's birthday last night and took a nap in the morning! | मैत्रिणीचा रात्री वाढदिवस केला साजरा अन् सकाळी घेतला गळफास !

मैत्रिणीचा रात्री वाढदिवस केला साजरा अन् सकाळी घेतला गळफास !

Next
ठळक मुद्देप्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या जिल्हा रुग्णालयातील वसतिगृहाच्या खोलीत आढळला मृतदेह

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील निवासी परिचारिकांच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या एका प्रशिक्षणार्थी युवा परिचारिकेने आपल्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बारा दिवसांत शहरात घडलेली ही दुसरी घटना आहे. माधुरी काशीनाथ टोपले (१९) असे मयत झालेल्या युवतीचे नाव आहे. माधुरीने मंगळवारी रात्री बारा वाजता आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस खोलीत सर्वांसोबत साजरा केला. सकाळी तिने अचानकपणे असे टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा शासकीय रुग्णालय हादरले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात परिचारिका प्रशिक्षण केंद्र वसतिगृह कार्यान्वित आहे. या वसतिगृहाच्या तळ मजल्यावरील आठ क्रमांकाच्या खोलीत राहणारी माधुरी टोपले (१९, रा. वांगण, ता. सुरगाणा) हिने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर १५ नोव्हेंबर २०२१ मध्ये परिचारिकेच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. ती प्रशिक्षणार्थी म्हणून नर्सिंगचे धडे येथे गिरवत होती. खोलीत तीन मैत्रिणींसमवेत ती राहत होती. सर्वांशी मिळून मिसळून वागणारी माधुरी ही हसतमुख असायची. तिने अशाप्रकारे टाेकाचा निर्णय घेतल्याने वसतिगृहातील शिक्षक, विद्यार्थिनींसह सर्वच चक्रावून गेले आहे. तिच्य रूममधील मैत्रिणीचा वाढदिवस आनंदाने माधुरीने रात्री साजरा केल्याचे अधिपरिसेविका वाघ यांनी सांगितले. केक कापून सर्वांनी फोटोसेशन केले. मात्र, सकाळी अचानकपणे तिने खोलीमधील पंख्याला पांढरी ओढणी बांधून गळफास घेतला. बुधवारी (दि. १५) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. काही वेळेनंतर अधिपरिचारिका रजनी राठोड यांनी माधुरीला खाली उतरविले व कक्षसेवक नीलेश निकम यांच्या मदतीने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. डॉ. बोरा यांनी तपासून तिला मयत घोषित केले.

---इन्फो---

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात !

माधुरीच्या आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते. घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांकडून माधुरीच्या मोबाइलची पडताळणी केली जात आहे. माधुरीच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. तिच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

--इन्फो---

बारा दिवसांत दुसरी घटना

तारवालानगर येथे राहणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकेने २ जून रोजी राहत्या घरी गळफास घेत आपला जीवनप्रवास संपविला होता. यानंतर प्रशिक्षणार्थी परिचारिका माधुरी हिनेही अशाचप्रकारे आपला जीवन संपविले. बारा दिवसांमध्ये घडलेल्या दोन घटनांनी जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. माधुरीने मृत्यपूर्व कुठल्याही प्रकारची चिठ्ठी वगैरे खोलीत लिहून ठेवलेली नव्हती, असे समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सरकारवाडा पोलिसांकडून केला जात आहे.

 

Web Title: Celebrated my friend's birthday last night and took a nap in the morning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.